रायगड - कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासन नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी खबरदारी घेत आहेत. यामध्ये स्थानिक प्रशासनही आपल्या जनतेच्या सुरक्षेसाठी पावले उचलत आहेत. रोहा नगरपरिषदेने रोहेकरांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शहरात दोन ठिकाणी चक्क कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष उभारून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर सॅनिटायझरची फवारणी केली जात आहे. त्यामुळे येणारे जाणारे हे सॅनिटायझरच्या सहाय्याने निर्जंतुक होत आहेत. पालकमंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून ही सुविधा रोहा नगरपरिषदेने अंमलात आणली आहे.
देशभरात कोरोना विषाणू थैमान घालत आहे. राज्यातही कोरोनाची झालेले एकूण 690 रुग्ण आहेत. रायगड जिल्ह्यात पनवेल महानगर पालिका क्षेत्र सोडले तर जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नाही. त्यामुळे काही प्रमाणात जिल्ह्यात आरोग्य सुरक्षेचे वातावरण आहे. मात्र, असे असतानाही पोलीस, आरोग्य प्रशासन जिल्ह्यात जनतेची खबरदारी घेत आहेत. स्थानिक प्रशासन असलेले ग्रामपंचायत, नगरपरिषद ह्या सुद्धा खबरदारीची पावले उचलत आहे.
रोहा नगरपरिषदेने शहरात उभारले नागरीकांसाठी कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष - आमदार अनिकेत तटकरे
रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून रोहा नगरपरिषद माध्यमातून शहरातील मारुती नाका आणि रोहा धाटाव रस्त्यावर नवरतन हॉटेल जवळ कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष तयार करून त्यात सॅनिटायझर फवारे लावण्यात आले आहेत.
रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून रोहा नगरपरिषद माध्यमातून शहरातील मारुती नाका आणि रोहा धाटाव रस्त्यावर नवरतन हॉटेल जवळ कोरोना निर्जंतुकिकरण कक्ष तयार करून त्यात सॅनिटायझर फवारे लावण्यात आले आहेत. यासाठी रस्त्याच्या ठिकाणी पॅडॉल तयार करून टाकीत सॅनिटायझर तयार करून ते फवाऱ्याच्या द्वारे कक्षातून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या संपूर्ण अंगावर पडले जात आहे. कोरोना निर्जंतुकरण कक्षातून जाताना जाताना हात वर करणे, डोळे बंद ठेवणे, चालताना वर बघू नये, मास्क काढू नये अशा सुचनाही नगरपरिषदेकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सॅनिटायझरमुळे स्वतः नागरिकच निर्जंतुक होत आहेत. रोहा नगरपरिषदेने शहरात केलेल्या या आरोग्य सुविधेचे नागरिकांनी स्वागत केले आहे.