महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून दुकानदारांना गंडा घालणाऱ्या टोळीला खोपोलीत अटक - raigad news

आज साधी भाजी खरेदी करायची म्हटले तरी ऑनलाईन पेमेंट केले जाते. हे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी चांगली बाब आहे. मात्र याच संधीचा फायदा घेत पनवेल शहरात दुकानदाराची फसवणूक करत होतो. दुकानामध्ये खरेदी करायची आणि ऑनलाईन पेमेंट करतो म्हणून मोबाईलवरून पैसे पाठवण्याची प्रक्रिया करायचे. आणि पैसे पाठवल्याचा मेसेज दाखवून तेथून पसार होत असत.

Online fraud to shopkeeper in Panvel
ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून दुकानदारांना गंडा घालणाऱ्या टोळीला खोपोलीत अटक

By

Published : Jul 31, 2021, 9:38 AM IST

खालापूर (रायगड) - सध्या ऑनलाईन पेमेंट आज सर्वत्र व्यवहारात मोठ्या प्रमाणात वापरले जाते. याचाच फायदा घेत पनवेल परिसरात एक ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून दुकानदारांना गंडा घालणारी टोळी सक्रिय झाली होती. पनवेलमध्ये अनेक व्यापाऱ्यांना गंडा घातल्यानंतर ती खोपोली शहरात आली होती. त्यांनी खापोलीमध्ये दोन दुकानदारांची फसवणूक केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरात सापळा रचून या दोन जणांच्या टोळीला पकडण्यात यश आले आहे. त्यामुळे खोपोली बाजारपेठेत होणारी फसवणूक टळली आहे.

पैसे पाठवल्याचा मेसेज दाखवून होत असत पसार -

याबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की, सध्या सर्वत्र ऑनलाईन पेमेंटचा पर्याय मोठ्या प्रमाणात वापरला जातो. साधी भाजी खरेदी करायची म्हटले तरी ऑनलाईन पेमेंट केले जाते. हे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी चांगली बाब आहे. मात्र याच संधीचा फायदा घेत पनवेल शहरात दुकानदाराची फसवणूक करत होतो. दुकानामध्ये खरेदी करायची आणि ऑनलाईन पेमेंट करतो म्हणून मोबाईलवरून पैसे पाठवण्याची प्रक्रिया करायचे. आणि पैसे पाठवल्याचा मेसेज दाखवून तेथून पसार होत असत. इकडे दुकानदार त्याच्या पैश्याची वाट पाहत असे. दुकानाबाहेर जाताच पैसे पाठवण्याची प्रक्रिया बंद करून धुम ठोकत असत. असे करून त्यांनी पनवेलमध्ये अनेक व्यापाऱ्यांना गंडा घातला होता. त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा हा खापोलीकडे वळवला होता. खोपोली शहरात त्यांनी दोन दुकानदारांना गंडवले आहे.

फरार होण्याच्या प्रयत्नात असतांना पकडले रंगेहात -

खोपोली मध्ये दोन व्यापाऱ्यांना ऑनलाईन गंडा घातल्याची माहिती पोलिसांनी समजली. त्यांनी याची चौकशी केली असता अश्या घटना घ्या पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याचे त्यांना कळाले. याबाबत खोपोली पोलिसांनी खोपोली पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ कारवाईला सुरूवात केली. गुन्हे प्रकटिकरण शाखेचे पी.सी. खरात व अन्य सहकारी यांनी खोपोली बाजरपेठेत साफळा रचला. 29 जुलै गुरुवारी संध्याकाळी एका दुकानाजवळ दोन जण एका दुकानात घुसून खरेदीनंतर ऑनलाईन पेमेंट केले असे सांगत तेथून फरार होण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांना रंगेहात पकडले. या तासाभरात ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून गंडा घालणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केलेल्या कामगिरीबाबत त्यांचे कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details