संभाव्य चक्रीवादळ आपत्तीमुळे रायगडात रास्त भाव धान्य दुकाने राहणार बंद
प्रादेशिक हवामान विभागाने अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे समुद्रात चक्रीवादळ निर्माण होऊन रायगडच्या किनारपट्टीला याचा फटका बसणार आहे.
रायगड - येथील किनारपट्टीवर 3 जूनला चक्रीवादळ धडकणार असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यादिवशी रास्त धान्य भाव दुकाने बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेश काढले, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत सर्व रास्त भाव धान्य तसेच केरोसीन दुकानदारांना सूचना दिल्या आहेत.
प्रादेशिक हवामान विभागाने अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे समुद्रात चक्रीवादळ निर्माण होऊन रायगडच्या किनारपट्टीला याचा फटका बसणार आहे. 3 जून रोजी चक्रीवादळ हे रायगडच्या किनारपट्टीवर येणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी 3 जून रोजी घराबाहेर पडू नये, असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकात जिल्ह्यातील रास्त धान्य भाव आणि किरकोळ केरोसीन दुकानेही 3 जूनला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशान्वये बंद ठेवण्यात येणार आहेत.