महाराष्ट्र

maharashtra

खोपोलीतील सुभाष नगर ग्रामस्थांच्या रस्त्याच्या संघर्षाला यश

By

Published : Apr 24, 2021, 2:22 PM IST

खोपोली नागरपरिषेदेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 मधील सुभाष नगर येथील सर्व ग्रामस्थांनी होणाऱ्या नवी पर्यायी रस्त्याला विरोध करत जुन्याच रस्त्याची मागणी करीत या रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी केली होती. दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आल्याने येथील ग्रामस्थामध्ये समाधानांची भावना व्यक्त होत आहेत.

रस्ता, roads
रस्ता

रायगड- गेल्या दीड वर्षांपासून सुभाष नगर ग्रामस्थ 50 वर्ष जुना पूर्वापार रेल्वे गेट/ मस्कॉ गेट ते जाधव मामा यांचा घरापर्यंत जाण्या येण्याकरिता कायमावरूपी रस्ता व्हावा, यासाठी संघर्ष करत होते. खोपोली नागरपरिषेदेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 मधील सुभाष नगर येथील सर्व ग्रामस्थांनी होणाऱ्या नवी पर्यायी रस्त्याला विरोध करत जुन्याच रस्त्याची मागणी करीत या रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी केली होती. दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आल्याने येथील ग्रामस्थामध्ये समाधानांची भावना व्यक्त होत आहेत.

नागरिकांमधून समाधान व्यक्त -

खोपोली शहरातील सुभाष नगर येथील जुन्या पूर्वापार रस्त्याचे नूतनीकरण 50 वर्षांपूर्वी झाले होते. त्यानंतर या रस्त्याबाबत मधल्या काळात पर्यायी रस्त्यावरून वाद निर्माण झाले होते. मात्र, येथील ग्रामस्थांनी या प्रस्तावाला विरोध करीत नगरपरिषदेचे मुख्यधिकारी गणेश शेटे यांना 11 डिसेंबर 2019 रोजी दिले होते. सुभाषनगरच्या पूर्वापार रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे व या प्रभागातून सलग तीन वेळा निवडुन येणारे व या परिसराचा विकास करून नावारूपास आणारे खोपोली नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कै. सखाराम गेणु जाधव याचे नाव या रस्त्याला देऊन नामकरण करण्यात यावे, या प्रमुख तीन मागण्या केल्या होत्या.

डांबरीकरण कामाला सुरूवात -

अडीच- तीन हजार पेक्षा जास्त लोक संख्या असलेल्या सुभाष नगर मध्ये महिंद्रा (मस्कॉ) कंपनी मधील काम करत असलेला कामगार, रिटायर्ड कामगार यांचाच घरातील सदस्य राहतात. याचा कामगारांचा घरातील मुले कंपनीच्या जे.सी.एम.एम स्कूल मध्ये शिक्षण घेत आहेत. शिक्षणासाठी व नोकरी साठी बाहेर जाणाऱ्या माता भगिनींना नवीन पर्यायी रस्ता हा आड मार्ग होता तोच जुना पूर्वापार रस्ता गुडलक ते सुभाष नगर कायम रहदारी असल्यामुळे सुरक्षित आहॆ.

नवी पर्यायी रस्त्यावरून गावा परियांत नगर परिषदेची बस सेवा, उद्या एखाद्या आपत्कालीन परिस्तिथी मध्ये रुग्णवाहिका आणि फायर ब्रिगेडची गाडी या अरुंद रस्त्यामुळे आतमध्ये येणे शक्य नव्हते आणि बाहेरून जाणाऱ्या या रस्त्याचे रिक्षाचे भाडे येथील सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाही. गेले दीड वर्ष या विषय संदर्भात मुख्यधिकारी यांची भेट घेऊन तसे स्मरण पत्र देऊन पाठपुरावा करण्यात आला. अखेर या प्रमुख मागण्यामधील रस्त्याच्या डांबरीकारण कामाला सुरुवात करण्यात आली आहॆ. या रस्त्यांसाठी 94 लाख 23 हजार 294 रूपये खर्च येणार आहे. संघर्षाचा हा लढा सुरूच ठेवला आणि त्याला अखेर यश मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details