महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्ग : कशेडी घाटात भोगाव येथील रस्ता खचला - mumbai Goa highway

जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने, अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. पोलादपूर तालुक्यातही य पावसाचा फटका बसला. मुंबई गोवा महामार्गावरिल पोलदपूर तालुक्यातील कशेडी घाटा नजीक असलेल्या मौजे भोगाव येथील रस्ता पावसाच्या पाण्यामुळे खचला. यामुळे वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती. तेव्हा पर्यायी व्यवस्था म्हणून एकाच बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली.

मुंबई-गोवा महामार्ग : कशेडी घाटात भोगाव येथील रस्ता खचला

By

Published : Jul 29, 2019, 1:16 AM IST

Updated : Jul 29, 2019, 7:23 AM IST

रायगड- मागील दोन दिवसांपासून मुंबईसह कोकण विभागात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. या दोन दिवसादरम्यान झालेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील मौजे भोगाव (येलंगेवाडी) येथील रस्ता खचला आहे. त्यामुळे एकाच बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारणा केली असता, आज सोमवारी (29 जुलै) ला रस्ता दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी डिव्हाडर लावण्यात आले आहेत.

मुंबई-गोवा महामार्ग : कशेडी घाटात भोगाव येथील रस्ता खचला

जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने, अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. पोलादपूर तालुक्यातही य पावसाचा फटका बसला. मुंबई गोवा महामार्गावरील पोलदपूर तालुक्यातील कशेडी घाटा नजीक असलेल्या मौजे भोगाव येथील रस्ता पावसाच्या पाण्यामुळे खचला. यामुळे वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती. तेव्हा पर्यायी व्यवस्था म्हणून एकाच बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली. दरम्यान, खचलेल्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी काळजी घेऊन वाहतूक करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महामार्गाच्या कशेडी येथील हायवे चौकीमध्ये खचलेल्या रस्त्याबाबत माहिती कळवण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासन व पोलिसांकडून सार्वजनिक बांधकाम विभाग महाडचे उपअभियंता गायकवाड यांना याबाबत कळवले असल्याचे सांगण्यात आले. तर उद्या या रस्त्याची दुरुस्ती केली जाईल, असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Last Updated : Jul 29, 2019, 7:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details