महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ७८ उमेदवार रिंगणात, 34 जणांची माघार

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत आज जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघात अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवस होता. 34 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर 80 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

जिल्ह्यात सात मतदारसंघात 78 उमेदवार रिंगणात, 34 जणांची माघार

By

Published : Oct 7, 2019, 8:51 PM IST

रायगड -विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत आज जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघात अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवस होता. 34 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर 80 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामध्ये श्रीवर्धन आणि अलिबाग मतदारसंघात काँग्रेसचे चार उमेदवार, तर उरण मतदारसंघात भाजपचे उमेदवार बंडखोरी करून निवडणूक लढवीत आहेत.

जिल्ह्यात ७ मतदारसंघात 78 उमेदवार रिंगणात, 34 जणांची माघार

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप अशी आघाडी राज्यात आहे. अलिबागमध्ये काँग्रेसने वकील श्रद्धा ठाकूर यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. मात्र, काँग्रेसचे राजेंद्र ठाकूर यांनीही आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. तर श्रीवर्धन मतदारसंघात आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे रिंगणात आहेत. याठिकाणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष दानिश लांबे, म्हसळा तालुकाध्यक्ष डॉ. मोईज शेख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी केली आहे. त्यामुळे अलिबाग आणि श्रीवर्धनमध्ये अधिकृत उमेदवारांविरोधात चार बंडखोर रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना या बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे.


दरम्यान उरण मतदारसंघात महायुतीचे मनोहर भोईर हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. त्याच्या विरोधात भाजपचे महेश बालदी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. तर पनवेलमध्येही शिवसेनेचे बबन पाटील यांनी भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात बंडखोरी केली होती. मात्र, बबन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.


अलिबाग, श्रीवर्धन, उरण मध्ये बंडखोर उदंड झाले असल्याने याठिकाणी आघाडी व युतीच्या उमेदवारांना फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. बंडखोर उमेदवारांवर आता पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details