रायगड- जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मंगळवारी 19 नोव्हेबरला मंत्रालयात पार पडणार आहे. याबाबत रायगड जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष पदाच्या आरक्षणासाठी इच्छुक डोळे लावून बसले आहेत. शेकापच्या सदस्या नीलिमा पाटील यांना अध्यक्ष पद देण्यात येणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. मात्र, आरक्षण खुला प्रवर्ग, ओबीसी सोडून एसटी अथवा इतर पडले तर अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अशी आघाडी आहे. शिवसेना आणि भाजप विरोधी बाकावर बसले आहेत. शेकाप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 12, काँग्रेस 3, भाजप 3 असे 59 चे बलाबल जिल्हा परिषदेमध्ये आहे.
हेही वाचा - पनवेल तहसील कार्यालयातील कारकुनाला लाच घेताना रंगेहाथ अटक