महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेस्क्यू ऑपरेशन: पुरात अडकलेल्या तिघांना वाचवण्यात यश - पुरात अडकलेल्या ३ जणांना वाचवण्यात यश

पोलादपूर येथे सावित्री नदीच्या संगमापलीकडे भंगार गोळा करण्यासाठी गेलेला तरुण पाण्याचा प्रवाह वाढल्याने अडकला. तानाजी किसन जाधव असे या युवकाचे नाव आहे. त्याला वाचविण्यास गेलेले दिलीप जाधव आणि असिफ मुजावर हे सुद्धा अडकले होते.

rescuing 3 people trapped in the flood in Raigad
पुरात अडकलेल्या तिघांना वाचवण्यात यश

By

Published : Aug 6, 2020, 9:53 PM IST

Updated : Aug 6, 2020, 10:02 PM IST

रायगड - पोलादपूर येथे सावित्री नदीच्या संगमापलीकडे भंगार गोळा करण्यासाठी गेलेला तरुण पाण्याचा प्रवाह वाढल्याने अडकला. तानाजी किसन जाधव असे या युवकाचे नाव आहे. त्याला वाचविण्यास गेलेले दिलीप जाधव आणि असिफ मुजावर हे सुद्धा अडकले होते. या तिघांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले असून, तिघांनाही वाचवण्यात यश आले आहे.

रेस्क्यू ऑपरेशन: पुरात अडकलेल्या तिघांना वाचवण्यात यश
कापडे आदिवासी वाडीवरील तरुण तानाजी जाधव हा पोलादपूरनजीक असलेल्या जुटा या बेटावर भंगार गोळा करण्यासाठी गेला होता. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे सावित्री नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढू लागला. पाण्याचा प्रवाह वाढल्याने तानाजी हा बेटावर अडकला. ही माहिती कळल्याने दिलीप जाधव आणि असिफ मुजावर यांनी तानाजीला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, तेसुद्धा बेटावर अडकले. ही माहिती पोलीस आणि तहसीलदार यांना फोनवर कळवल्यानंतर सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.
Last Updated : Aug 6, 2020, 10:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details