रायगड - जिल्ह्यात 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊनला सुरुवात झाले आहे. यामुळे गजबाजणारे रस्ते हे पुन्हा निर्मनुष्य झाले आहेत. बाजारपेठा सुन्यासुन्या झाल्या आहेत. पुन्हा एकदा नाक्यां-नाक्यावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर जिल्ह्यात मेडिकल सेवा सुरू आहे. इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत. या लॉकडाऊनला अनेक भागातून विरोध होत आहे.
रायगड पुन्हा 'लॉकडाऊन'ला सुरुवात; 26 जुलैपर्यंत राहणार टाळेबंदी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केले. जिल्ह्यात 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 26 जुलैपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. याकाळात मेडिकल दुकाने सुरू राहणार आहेत. तर किराणा, भाजीपाला, फळे, मटण, चिकन, मासळी बाजार हे पूर्णपणे बंद राहणार आहेत. तर
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यामुळे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केले. जिल्ह्यात 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 26 जुलैपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. याकाळात मेडिकल दुकाने सुरू राहणार आहेत. तर किराणा, भाजीपाला, फळे, मटण, चिकन, मासळी बाजार हे पूर्णपणे बंद राहणार आहेत. तर जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूच्या दुकानांना घरपोच सेवा देण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
या दरम्यान ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्या नागरिकांकडे पास नसलेल्या नागरिकांना पोलीस अडवून कारवाई करीत आहेत. जिल्ह्यातील महाडमध्ये माजी आमदार माणिक जगताप तसेच इतर नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध केला आहे. तरी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन बाबत संपूर्ण तयारी केली आहे.