महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट; परिस्थितीचा घेतला आढावा - district hospital

यावेळी त्यांनी रुग्णालयातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णांशी संवाद साधून रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. व्यवस्थापनाच्या अभावामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचे यावेळी त्यांच्या निदर्शनास आले. जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.

रवींद्र चव्हाण यांची जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट

By

Published : May 14, 2019, 8:45 PM IST

रायगड- रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज (मंगळवार) अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देऊन रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी रुग्णांनी तक्रारींचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. पालकमंत्र्यांच्या या भेटीमुळे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट

अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवाबाबत अनेक तक्रारी पालकमंत्र्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी याबाबत कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली होती. ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज वाढदिवस होता. त्यांची भेट घेण्यासाठी पालकमंत्री रेवदंडा येथे आले होते. तेथून परतताना त्यांनी जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप अलिबाग - मुरुड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष महेश मोहिते, पंचायत समितीत सदस्य उदय कठे, राजेश पाटील, निलेश महाडिक, दर्शन प्रभू आदी त्यांच्यासोबत होते.

रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट; परिस्थितीचा घेतला आढावा

यावेळी त्यांनी रुग्णालयातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णांशी संवाद साधून रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. व्यवस्थापनाच्या अभावामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचे यावेळी त्यांच्या निदर्शनास आले. जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.

https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/r-mh-1-rgd-palakmantri-bhet-slug-rajesh_14052019183618_1405f_1557839178_833.JPG

बाह्य रुग्ण विभागात दररोज येणाऱ्या रुग्णांची तसेच त्यांच्यावर झालेल्या उपचारांची माहिती ई-मेलद्वारे पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि शहरातील प्रमुख व्यक्ती आणि पत्रकार यांना देण्याचे आदेश त्यांनी दिले.

रुग्णालयातील डॉक्टरांच्या रिक्त पदांचा आढावा त्यांनी घेतला. बाहेरून खासगी डॉक्टर बोलवा. त्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन मंडळातून देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. सेवाभावी वृत्तीने जे प्रतिष्ठित डॉक्टर रुग्णालयात काम करण्यास तयार असतील, त्यांना संधी द्या. नादुरुस्त यंत्रणांची तातडीने दुरुस्ती करून घ्या असे निर्देशही त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले.

रवींद्र चव्हाण यांची जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट

जिल्हा रुग्णालयात आहे त्या परिस्थितीत चांगली रुग्णसेवा देता यावी यासाठी प्रयत्न करा, स्वच्छता नीट राखली जात नसेल तर बाहेरचे कंत्राटदार नेमून परिसराची स्वच्छता करून घ्या, डॉक्टरांची रिक्त पदे आऊट सोर्सिंगने भरा, बाह्यरुग्ण सेवेची माहिती दररोज ई- मेलवर द्या, अशा सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details