रायगड : फुलपाखरू अंडकोशातून बाहेर पडताना, साप कात टाकताना आपण अनेकांनी पाहिले असेल. मात्र समुद्रातील जलचर प्राण्यांचे कात टाकणे हे सहसा आपल्या पाहण्यात येत नाही. मात्र, कोळंबीचा प्रकार असलेल्या लॉब्स्टर (शेवंडी) ही आपले जुने आवरण काढून टाकतानाचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
नागाव येथे समीर म्हात्रे यांनी एंटरटेनमेंट पार्कमध्ये फिश पर्यटकांसाठी अक्वेरियम बनविले आहे. या अक्वेरियममध्ये समुद्रातील विविध प्रकारचे मासे पाहण्यास ठेवले आहेत. यामध्ये कोळंबी जातीची एक शेवंडीही ठेवली आहे. ही शेवंडी अर्धा फूट रुंद आहे. ही शेवंडी आपला नवा जन्म घेतानाचा व्हिडीओ समीरचे भाऊ स्वप्नील यांनी चार दिवसांपूर्वी चित्रित केला आहे.