महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडमध्ये CAA आणि NRC विरोधात 'संयुक्त समाज म्हसळा तालुका' तर्फे 'एकता रॅली'चे आयोजन - म्हसाळा शहरात सीएए कायद्या विरोधात मोर्चा

म्हसळा तालुक्यातील 19 गावांतील विविध समाजाच्या लोकांनी एकत्र येत सीएए आणि एनआरसी विरोधात शांतीपूर्वक मोर्चा काढला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कौचली अली यांनी, देशाचे संविधान बदलण्याचा जर प्रयत्न केला तर रक्तपात होईल, असा इशारा दिला आहे.

rally for Opposition to CAA and NRC law in Mhasala city
म्हसाळा शहरात संयुक्त समाज म्हसळा तालुका यांच्यातर्फे 'एकता रॅली'चे आयोजन

By

Published : Jan 3, 2020, 10:06 PM IST

रायगड -सीएए व एनआरसी लागू केल्यामुळे केंद्र सरकारने मुस्लिम, बौद्ध व ओबीसी समाजाच्या नागरिकांना डिवचण्याचे काम केले आहे. या सरकारने देशाचे संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर, देशात रक्ताच्या नद्या वाहतील, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अली कौचली यांनी केले आहे. म्हसळा तालुक्यातील 19 गावांतील विविध समाजाच्या लोकांनी एकत्र येत सीएए आणि एनआरसी विरोधात शांतीपूर्वक मोर्चा काढला. यावेळी आयोजित सभेत कौचली अली बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कौचली अली यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... #CAA: २६ वर्ष वाट बघितली तरी कायदा रद्द होणार नाही; अनुराग ठाकूर यांचा ओवैसींना टोला

म्हसळा शहरात तालुक्यातील संयुक्त समाजातर्फे केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए व एनआरसी कायद्याविरोधात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक कानिफ भोसले यांनी देखील केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका करून सीएए व एनआरसी हे कायदे बहुजन समाजविरोधी असल्याचे म्हटले. संयुक्त समाजातर्फे अंजुमान शाळा ते तहसील कार्यालय म्हसळापर्यंत हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या नागरिकांनी शांतीपूर्वक मोर्चा काढला. तसेच या कायद्याला आपला विरोध असल्याचे पत्र तहसिलदार यांना देऊन मोर्चाची समाप्ती केली.

हेही वाचा... 'मुस्लीम समुदायाला भडकविण्याचे काम विरोधकांकडून सुरु'

ABOUT THE AUTHOR

...view details