रायगड - रमजान हा मुस्लीम धर्मियांचा पवित्र महिना मानला जातो. मुस्लीम बांधव या महिन्यात रोजा पाळतात. हा रोजा लहान मुलापासून मोठ्यापर्यंत पाळतात. मात्र, आलिबाग शहरातील रामनाथ परिसरात राहणारे राजू घूमकर हे गेल्या 21 वर्षापासून रोजाचे उपवास करीत आहेत. मुस्लीम धर्मियांचा रोजा करीत असले तरी त्यांनी हा धर्म स्वीकारलेला नाही. मात्र, त्यातून त्यांना एक आत्मिक सुख मिळत असल्याची भावना राजू घूमकर यांनी व्यक्त केली आहे.
हिंदू असूनही गेल्या 21 वर्षापासून राजू घूमकर करतायेत रोजाचे उपवास - हिंदू धर्मीय असणाऱ्यांनी केला रोजा
आलिबाग शहरातील रामनाथ परिसरात राहणारे राजू घूमकर हे गेल्या 21 वर्षापासून रोजाचे उपवास करीत आहेत. मुस्लीम धर्मियांचा रोजा करीत असले तरी त्यांनी हा धर्म स्वीकारलेला नाही.
राजू घूमकर
मुस्लीम बांधवांचा रोजा पकडला म्हणून घरच्या लोकांनी आक्षेप घेतला नाही. मात्र, मित्रमंडळींनी त्याची चेष्टा केली. मात्र, या चेष्टेकडे दुर्लक्ष करून आजही घुमकर हे रोजाचे उपवास पूर्ण करीत आहेत. रोजाचे सर्व नियम पाळून ते रोजा करीत आहेत. त्यातून त्यांना एक आत्मिक सुखही मिळत असल्याचे घुमकर यांनी सांगितले. धर्म कुठलाही असला तरी इच्छा शक्ती असली तर घुमकरसारखे लोक घेतलेले व्रत आजही पूर्ण करीत आहेत. तसेच हिंदू धर्मियात असलेले सणही तेवढ्याच श्रद्धेने ते साजरे करत आहेत.