महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लेडीज बार बंद करण्यासाठी राजे प्रतिष्ठानचे 'मुंडन आंदोलन' - चंद्रकांत धडके

यावेळी मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या डोक्यावरील केस काढून लेडीज बारचा निषेध केला.

लेडीज बार बंद करण्यासाठी राजे प्रतिष्ठानचे 'मुंडन आंदोलन'

By

Published : Jul 7, 2019, 8:57 AM IST

पनवेल- शहरात ‘लेडीज सर्व्हिस’ किंवा ‘ऑर्केस्ट्रा’च्या नावाखाली सर्रास डान्सबार सुरू आहेत. राज्य सरकारने कितीही नियम बनवले तरी ते धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे शहरातील नागरी वस्तीतील लेडीज बार बंद करण्यात यावेत, यासाठी राजे प्रतिष्ठानने मुंडन आंदोलन केले. संस्थापक अध्यक्ष छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वामध्ये मुंडन आंदोलन करण्यात आले.

लेडीज बार बंद करण्यासाठी राजे प्रतिष्ठानचे 'मुंडन आंदोलन'

यावेळी मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या डोक्यावरील केस काढून लेडीज बारचा निषेध केला. लेडीज बारमुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. नागरी वस्तीतील लेडीज बारचा येथील रहिवाशांना तसेच महिलांना मोठा त्रास होत, असल्याचे मत राजे प्रतिष्ठानचे चंद्रकांत धडके यांनी सांगितले.

याठिकाणी मद्य प्राशन करून बाहेर येणाऱ्या आंबट शौकिनांची नजर ही परिसरातील नागरिकांच्या मनात लज्जा उत्पन्न करणारी असते. महिलांचा आदर करणे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिकवण आहे. त्यामुळे वेळीच नागरी वस्तीतील हे बार शहराबाहेर हलविले नाही, तर राजे प्रतिष्ठान पद्धतीने धडा शिकवला जाईल, असा इशारादेखील यावेळी राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी दिला.

यावेळी राजे प्रतिष्ठानचे मुंबई संघटक चंद्रकांत धडके, मुंबई अध्यक्ष प्रकाश कोळी, रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक, मुंबई सचिव संजय गुप्ता, नवी मुंबई संघटक प्रमुख विक्रम भोसले, नवी मुंबई उपाध्यक्ष अजय साळुंखे, पनवेल तालुकाध्यक्ष राज भंडारी, धारावी विधानसभा अध्यक्ष सचिन लोखंडे, सुनील वरेकर, पिंट्या तुपे, घाटला शाखाप्रमुख विजय भोसले, घणसोली शाखाप्रमुख रोहन भोसले, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details