रायगड - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या गाडीला एकवीरा देवीच्या दर्शनाहून परतत असताना नवी मुंबईजवळ अपघात झाला आहे. या गाडीत शर्मिला ठाकरे आणि त्यांची बहीण होती. अपघात मोठा नाही. मात्र, शर्मिला ठाकरे यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
नवी मुंबईजवळ राज ठाकरेंची पत्नी शर्मिला यांच्या गाडीला अपघात - शर्मिला ठाकरे अपघात
राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या पत्नीच्या गाडीला अपघात झाला आहे. यामध्ये त्या किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या कुटुंबासोबत लोणावळा येथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना राज ठाकरे हे त्यांच्या कारने पुढे निघाले होते. त्यांच्यामागे असलेल्या कारमधून राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि बहीण दोघीही बसल्या होत्या. सानपाडा सिग्नल या ठिकाणी त्यांची गाडी पोहोचली असता गाडीमध्ये रिक्षा आली. रिक्षाला धडक बसू नये म्हणून ड्रायव्हरने ब्रेक मारला. त्यामुळे पाठीमागून येत असलेली कार शर्मिला ठाकरेंच्या कारवर धडकली. यामध्ये त्या किरकोळ जखमी झाल्या.
दरम्यान या ठिकाणी दुसरी कार मागवण्यात आली. त्यानंतर शर्मिला ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेले सर्वजण मुंबईच्या दिशेने रवाना झाले.