अलिबाग (रायगड) Raj Thackeray on Raigad Land : महाराष्ट्रातील जमिनीवर होणाऱ्या परप्राांतियांच्या आक्रमणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधलाय. ते आज अलिबागमध्ये जमीन परिषदेत बोलत होते.
काय म्हणाले राज ठाकरे :मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जमिनीवर होणाऱ्या आक्रमणावर म्हणाले की, "पुणे, नाशिक, ठाणे, मुंबईची वाट लागली आहेच. तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे. याचा तुम्हाला अंदाज आहे का? बाकीच्या राज्यातील स्थानिक नेते अलर्ट असतात. ते त्यांच्या लोकांचा पहिले विचार करतात. अलिबागमधील काही गावं संपली आहेत. तिथल्या जमिनी गेल्या आहेत. तुमच्याकडं जमीन नसेल तर, तुम्ही कुठलेही नागरिक नाही. पैशाची गरज आहे. पण जमीन विकल्यावर ती कोणाच्या घशात जाते? त्याचा मोबदला योग्य मिळतोय का, दलाल बहुतांशी मराठी असल्यानं आपला विश्वास बसतो. पण तो तुमच्याकडून स्वस्तात जमीन घेवून सरकारला महागात विकतो."
पैसे देऊन बलात्कार सुरु : सध्या महाराष्ट्रातील जे उत्तम आहे ते हिसकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्व बाजूंनी हे प्रयत्न सुरु आहेत. पैसे देऊन बलात्कार सुरू आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, याचं गांभीर्य सर्वांना कळायला हवं. महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या मराठ्यांच्या जमिनी जात आहेत. तुमच्या तालुक्यात तुमचा उद्योग असायला पाहिजे, मराठी उद्योजक उभे करा. आपण आपल्या गोष्टी वाचवल्या पाहिजेत. पुढच्या 4-5 वर्षात परिस्थिती हाताबाहेर जाईल, अस राज ठाकरे यावेळी म्हणाले.
- आसाम मेघालयात जमीन घेऊन दाखवा : जमिन खरेदीच्या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, आपल्याकडे स्थलांतराचा कायदा नीट राबवला जात नाही, तुम्ही हिमाचस प्रदेश, आसाम, मेघालयात जमिन घेऊन दाखवा. तिकडे जमीन घेण्यासाठी परवाना मिळत नाही, असंही ठाकरे म्हणाले.
- कालांतरानं माझे शब्द आठवतील : राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आपल्या जमिनी वाचवण्याचं तसंच न विकण्याचं आवाहन करत म्हटलं की, ''आपल्या लोकांना भान राहिलेलं नाही. माथेरान, नेरळमध्ये बघा कोण घरं घेत आहेत. मराठी लोक संपत चालली आहेत. देशावर राज्य करणाऱ्या मराठा लोकांच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत. त्यांना पोरकं केलं जातंय. आपण आपल्या जमिनी शांतपणे वाचवल्या पाहिजेत. कालांतरानं माझे शब्द आठवतील, पण नंतर कपाळावर हात मारण्याची वेळ येईल."
हेही वाचा :
- राम मंदिर कारसेवकांच्या कष्टाचे फळ 22 तारखेला, लोकांना त्रास न होता उत्सव साजरा करा - राज ठाकरे
- वाहनांची रांग पाहून राज ठाकरे उतरले टोल नाक्यावर; मग काय झालं? पाहा व्हिडिओ