महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडमध्ये ४ दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह पावसाची तुफान बॅटींग - रायगड पाऊस

रायगडमध्ये विजांचा जोरदार कडकडाट सुरू आहे. यामुळे सध्या रस्त्यांवर सामसूम असल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच सोसाट्याचा वाऱ्यामुळे घरांवरील पत्र्याची छपरे उडून नुकसान झाले आहे.

रायगडमध्ये ४ दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह पावसाची तुफान बॅटींग

By

Published : Oct 10, 2019, 5:42 PM IST

रायगड -गेल्या चार दिवसांपासून खालापूरसह कर्जत तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दररोज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात होते. रात्रीपर्यंत पाऊस सुरू असतो.

रायगडमध्ये विजांचा जोरदार कडकडाट सुरू आहे. यामुळे सध्या रस्त्यांवर सामसूम असल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच सोसाट्याचा वाऱ्यामुळे घरांवरील पत्र्याची छपरे उडून नुकसान झाले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू आहे. तसेच प्रचारासाठी अवघे ८ दिवस बाकी राहिले आहे. त्यातच पावसाने तुफान बॅटींग सुरू केली. त्यामुळे उमेदवारांना देखील प्रचारासाठी बाहेर पडता येत नाही. त्यामुळे त्यांच्यातदेखील नाराजी पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details