रायगड -जिल्ह्यात रात्रीपासून पावसाला मुसळधार सुरुवात झाली असल्याने रायगडकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने ठाणे, पालघर, रायगडमध्ये 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. जिल्हा प्रशासनाकडूनही सर्व यंत्रणांना, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
रायगडमध्ये मुसळधार पाऊस, 24 तासात अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा - रायगडमध्ये जोरदार पाऊस
रायगडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याती शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
जिल्ह्यात आठवड्यापासून ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. गणपती उत्सव काळातही पावसाने थैमान घातले होते. सप्टेंबर महिना उजाडला तरी पावसाने अजून विश्रांती घेतलेली नाही. शेतीही चांगली बहरली असून अति पावसामुळे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे पावसाने आता विश्रांती घ्यावी अशी याचना शेतकरी करत आहेत.
जिल्ह्यात रात्रीपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचलेले आहे. समुद्रामध्ये मच्छिमारांना मच्छिमारीसाठी जाण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.