महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडमध्ये 48 तासात हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा, जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेश - Meteorological department

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून पाऊस गायब झाला होता. त्यामुळे रायगडकर उन्हाच्या झळानी घामाघूम झाले होते. आज मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने रायगडकर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले.

रायगडमध्ये 48 तासात हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा, जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेश

By

Published : Jul 24, 2019, 9:24 PM IST

रायगड -आठ दिवस पावसाने जिल्ह्यात उसंत घेतल्यानंतर आज मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. येत्या 48 तासात जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जिल्ह्यात आज 24 जुलैला एकूण 1728.40 मिमी पाऊस पडला असून सरासरी 107.90 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रोहा तालुक्यात सर्वाधिक 290 मिमी पाऊस पडला आहे. मुसळधार पावसाने नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली नसली तरी नदीकिनारी व समुद्र किनाऱ्यावरील गावांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

रायगडमध्ये 48 तासात हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा, जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेश

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून पाऊस गायब झाला होता. त्यामुळे रायगडकर उन्हाच्या झळानी घामाघूम झाले होते. आज मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने रायगडकर नागरीकाना दिलासा मिळाला आहे. मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले.

पावसामुळे जिल्ह्यातील नद्यां तुडूंब भरून वाहू लागल्या आहेत. सध्या नदीचे पाणी धोका पातळीच्या खालून वाहत आहे. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्यास अंबा, सावित्री, कुंडलिका नद्या आपली धोका पातळी ओलांडून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आज समुद्रात साडेचार वाजण्याच्या सुमारास उंच लाटा उसळणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून नदी किनारी व समुद्रकिनाऱ्याच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत.

24 जुलैला अलिबाग 80 मिमी, पेण 140 मिमी, मुरुड 68 मिमी, पनवेल 98.20 मिमी, उरण 124 मिमी, कर्जत 10.20 मिमी, खालापूर 22 मिमी, माणगाव 193.20 मिमी, रोहा 290 मिमी, सुधागड 77 मिमी, तळा 211 मिमी, महाड 95 मिमी, पोलादपूर 94 मिमी, म्हसळा 133 मिमी, श्रीवर्धन 60 मिमी, माथेरान 31 मिमीपावसाची नोंद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details