महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी - रायगड बातमी

आज पहाटेपासून राडगडमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असून रायगडकर सुखावले आहेत. मात्र, अचानक बरसलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळही उडाली.

spot photo
पावसाने भिजलेले रस्ते

By

Published : Jun 1, 2020, 9:45 AM IST

रायगड - जिल्ह्यात आज (दि. १ जून) पहाटेपासून रिमझिम पावसाने विजांच्या कडकडाटासह सुरुवात केली आहे. त्यामुळे उन्हाच्या उकाड्याने हैराण झालेले रायगडकर पावसाच्या आगमनाने सुखावले आहेत. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर मातीचा सुगंध सुटल्याने वातावरण प्रफुल्लित झाले आहे.

रायगडात पावसाची हजेरी
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम समुद्र किनारपट्टीवर वादळ येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून पावसाची शक्यता व्यक्त केली होती. जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची रिमझिम सुरु होती. त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते हे पावसाच्या पाण्याने भिजले असून मातीला सुगंध सुटला आहे. पावसामुळे काहीअंशी उकाडा कमी झाल्याने रायगडकर सुखावले आहेत. मात्र, अचानक आलेल्या पावसाने रायगडकरांची काही प्रमाणात तारांबळ झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details