रायगड - भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनोत्सव शनिवारी 15 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. रायगडमध्ये शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे होणार आहे. पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या या उत्सवावरही कोरोना संकट असल्याने गर्दी टाळायची आहे. त्यामुळे ध्वजारोहण कार्यक्रम नागरिकांना यावेळी उपस्थित राहून पाहता येणार नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाने रायगडकरांना ध्वजारोहण कार्यक्रम फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
रायगडकर पाहणार फेसबुक लाईव्हद्वारे ध्वजारोहण सोहळा - independent day
भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ वा ध्वजारोहण सोहळा रायगडकरांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने रायगडकरांना ध्वजारोहण कार्यक्रम फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
शनिवार दिनांक १५ ऑगस्ट, २०२० रोजी सकाळी ०९.०५ वाजता पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे होणार आहे. दरवर्षी भारतीय स्वातंत्र्याचा ध्वजारोहण कार्यक्रम पाहण्यास शेकडो नागरिक हे पोलीस परेड मैदानावर गर्दी करतात. मात्र यावेळी कोरोना सारख्या महामारीने डोके वर काढल्याने त्याचे संकट सध्या जगावर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हा गर्दी मुळे वाढण्याची शक्यता असल्याने शासन आणि प्रशासन गर्दी टाळण्याचे आवाहन वारंवार करीत आहेत.
भारतीय स्वातंत्र्याचा हा कार्यक्रम कोरोनामुळे नागरिकांना उपस्थित राहून पाहता येणार नाही. हा कार्यक्रम नागरिकांना घरातच बसून पाहता यावा यासाठी जिल्हा प्रशासनाने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून https://www.facebook.com/dioraigad06 या लिंक द्वारे पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे रायगडकर भारतीय स्वातंत्र्याचा हा सोहळा घरी बसून पाहणार आहेत.