महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

16 जानेवारीला पहिल्या दिवशी 400 जणांना देणार लस

16 जानेवारीला पहिल्या दिवशी 400 जणांना देणार लस... जिल्ह्यात 4 केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था...आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेण्याचे डॉ. किरण पाटील यांचे आवाहन.. लसीकरणावेळी पालकमंत्री राहणार उपस्थित

रायगड
रायगड

By

Published : Jan 15, 2021, 9:58 PM IST

रायगड- जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अलिबाग, पेण येथे प्रत्येकी 1 आणि पनवेल येथील 2 अशा 4 केंद्रांच्या माध्यमातून 400 आरोग्य कर्मचार्‍यांना कोव्हिशिल्ड लस दिली जाणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली. 8 हजार 200 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्यात कोव्हिशिल्ड लस दिली जाणार असून कर्मचाऱ्यांनी लस घेण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे. पालकमंत्री अदिती तटकरे यांची जिल्हा सामान्य रुग्णालय केंद्रावर प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

रायगड

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद
जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे. याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. किरण पाटील बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने उपस्थित होते.
4 केंद्रावर लसीकरण
रायगड जिल्ह्याला 13 जानेवारी रोजी ‘कोव्हीशिल्ड’ व्हॅक्सिनचे 9 हजार 500 डोस प्राप्त झाले आहेत. 16 जानेवारी सकाळी 9 वाजता जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात होईल. अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालय, पेण उपजिल्हा रुग्णालय, पनवेल तालुक्यातील एमजीएम मेडिकल कॉलेज व वायएमटी हॉस्पिटल अशा 4 केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
400 आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार लस
पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर 100 याप्रमाणे 4 केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यात पहिल्या दिवशी 400 आरोग्य कर्मचार्‍यांना लस दिली जाणार आहे. त्यानंतर हळूहळू या लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढवली जाणार असल्याची माहिती डॉ. किरण पाटील यांनी दिली.
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली समिती
लसीची पहिली मात्रा घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरी मात्रा दिली जाणार आहे. तसेच लसीकरणानंतर अर्धा तास त्या व्यक्तीला थांबवून ठेवले जाणार आहे. एखाद्याला लस दिल्यानंतर त्रास जाणवला, तर त्यावर उपाययोजना करण्याची संपूर्ण खबरदारी घेतली आहे. याकरिता जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. आपण दमदारपणे या मोहिमेला सामोरे जात आहोत. त्यामुळे न घाबरता या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आरोग्य कर्मचार्‍यांसह नागरिकांना केले आहे.
यांना दिली जाणार नाही लस


पहिल्या टप्प्यात गरोदर महिला, 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्ती, अ‍ॅलर्जीक रुग्ण, ज्येष्ठ नागरिक यांना लस दिली जाणार नसल्याचेही पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details