महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडमधील शेतकऱ्याने आंतरपीक घेऊन फुलविला भाज्यांचा मळा

रायगड जिल्हा हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध होता. मात्र, काही वर्षांपासून भातशेतीतून मिळणारे उत्पन्न कमी होत चालले आहे. त्याचबरोबर वाढलेले शहरीकरण, औदयोगिकीकारण यामुळे शेत जमीन कमी होत चालली आहे. तरीही जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेती करताना दिसत आहे. जिल्ह्यातील मुख्य पीक हे भातशेतीचे आहे. अलिबागमध्येही शेतकरी भातशेती कापणी नंतर वालाच्या शेंगा, सफेद कांदे याची लागवड करतात.

Raigad successful farmer inspiring story
रायगडातील शेतकऱ्याने आंतरपीक घेऊन फुलविला भाज्यांचा मळा

By

Published : Dec 23, 2019, 11:45 PM IST

रायगड - शेती व्यवसाय हा नुकसानीचा व्यवसाय असल्याचे शेतकरी बोलत असतात. मात्र, अशा परिस्थितीत अलिबाग तालुक्यातील कार्ले गावातील शरद घरत यांनी शेतीमध्ये भाजी, सफेद कांदा याचे आंतरपीक घेऊन जोड व्यवसाय शेतीत केला आहे. शेतात भाजीच्या आंतरपिक मळा फुलविल्याने शरद यांना त्याचा फायदा झाल्याचे दिसत आहे.

रायगडातील शेतकऱ्याने आंतरपीक घेऊन फुलविला भाज्यांचा मळा

जिल्हा हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध होता. मात्र, काही वर्षांपासून भातशेतीतून मिळणारे उत्पन्न कमी होत चालले आहे. त्याचबरोबर वाढलेले शहरीकरण, औदयोगिकीकारण यामुळे शेत जमीन कमी होत चालली आहे. तरीही जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेती करताना दिसत आहे. जिल्ह्यातील मुख्य पीक हे भातशेतीचे आहे. अलिबागमध्येही शेतकरी भातशेती कापणी नंतर वालाच्या शेंगा, सफेद कांदे याची लागवड करतात.

भातशेती नुकसानीत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे. त्यातच अलिबाग हे पर्यटन स्थळ असल्याने भातशेतीला सोन्याचा भाव आलेला आहे. त्यामुळे शेती विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. अशी परिस्थिती शेतीची असली तरी काही शेतकरी आजही आपल्या मेहनतीने शेती करून कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहेत.

हेही वाचा -भाववाढ रोखण्याची कसरत; आयातीच्या ७९० टन कांद्याची देशात आवक

अलिबाग तालुक्यातील कार्ले गावातील शेतकरी शरद घरत यांची दीड एकर शेत जमीन आहे. शिक्षण कमी असल्याने शेती करून ते आपल्या कुटूंबाचा चरितार्थ चालवीत आहेत. भावाच्या आणि शरद हे आपल्या कुटूंबासोबत पारंपरिक शेती कसत आहेत. भातशेतीत खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असल्याचे त्यानी आपल्या शेतात आंतरपीक घेण्याचे ठरविले. भातशेती कापणीनंतर शेतात सफेद कांदे, अल्कोहोल, फ्लॉवर, कोबी, वांगी, टॉमेटे, कोथींबीर, झेंडू फुले या पिकाची लागवड केली आहे. झालेले पीक ते अलिबाग, पोयनाड या बाजारात विकतात. त्यामुळे आर्थिक फायदाही त्यांना चांगला मिळत आहे.

हेही वाचा -संभाजी भिडेंसह मिलिंद एकबोटेंना पुण्यात चार दिवसांची 'जिल्हाबंदी'

भातशेतीत उत्पन्न कमी मिळत असले तरी शेतात आंतरपीक घेतल्यास आजही शेती व्यवसाय हा फायदेशीर आहे. यासाठी शेतकऱ्यांनी मेहनत घेणे गरजेचे आहे. शरद घरत यांनी भातशेती सोबत आंतरपिके घेतल्याने त्यांना शेतीतून चांगला फायदा मिळत आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनीही शरद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शेती केल्यास पुन्हा शेतकरी हा राजा होण्यास वेळ लागणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details