रायगड- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला एका वर्षातच विशेष न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. अजय कमलाकर वाघमारे (वय २२ वर्षे रा.रोडे काश्मिरे फणसवाडी ता.पेण जि.रायगड) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी अजय याचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा आहे. पीडित मुलीवर आरोपीने बळजबरीने अत्याचार केला होता. याबाबत पीडित मुलीच्या आईने मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पीडित १६ वर्षांच्या मुलीबरोबर एप्रिल २०१९ महिन्यात आरोपीने बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मे २०१९ मध्ये रात्री १० वाजण्याचे सुमारास आरोपी पीडित मुलीला फिरावयास घेऊन जाताना पीडितेच्या वडिलांनी पाहिले. याबाबत वडिलांनी आरोपीला त्यावरून हटकले तेव्हा आरोपीने पीडितेच्या वडिलांना उर्मटपणे मी तिच्यावर प्रेम करतो, मी तिच्याशी लग्न करणार आहे, असे सांगितले. त्यानंतर दिनांक २१ मे २०१९ ला आरोपीने पीडितेला पेण येथे बोलावून चवणे आदिवासी वाडीवर नेऊन तिच्याशी बळजबरीने शरीरसंबंध ठेवले.
मांडवा सागरी पोलिसात याची तक्रार दाखल झाल्यानंतर सदर केसच्या कामी आरोपी अजय कमलाकर वाघमारे यास दि. ०६ जून २०१९ ला अटक करण्यात आली होती. मांडवा पोलिसांनी आरोपीविरोधात चार्जशीट अलिबाग न्यायालयात दाखल केली होती. तेव्हापासून आजतागायत सदरचा आरोपी हा न्यायालयीन कोठडीत होता.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला सक्तमजुरी - raigad police latest crime news
मांडवा सागरी पोलिसात याची तक्रार दाखल झाल्यानंतर सदर केसच्या कामी आरोपी अजय कमलाकर वाघमारे यास दि. ०६ जून २०१९ ला अटक करण्यात आली होती. मांडवा पोलिसांनी आरोपीविरोधात चार्जशीट अलिबाग न्यायालयात दाखल केली होती. तेव्हापासून आजतागायत सदरचा आरोपी हा न्यायालयीन कोठडीत होता.
या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश व्ही.एम. मोहिते यांचे न्यायालयात झाली. या केसमध्ये सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी एकूण ७ साक्षीदार तपासले, सदर गुन्ह्यातील पीडित मुलगी, तीची आई व काका या सर्वांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. तसेच पैरवी अधिकारी सायगावकर व पोलीस हवालदार सचिन खैरनार आणि मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक ठाकूर यांचे सहकार्य मोलाचे ठरले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद तसेच सर्वोच्च न्यायालयाचे दाखल केलेले न्यायनिर्णय ग्राहय धरुन विशेष न्यायालयाने दि.१४ ऑगस्ट २०२० रोजी आरोपी अजय कमलाकर वाघमारे याला १० वर्षे सक्त मजूरी व ५०००/- रु. दंडाची शिक्षा ठोठावली. सदरच्या खटल्याकडे मांडवा परिसरातील तसेच अलिबाग तालुक्यातील लोकांचे लक्ष लागून राहीलेले होते.