रायगड -श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सकाळीच पेणमधील लहान मुलांच्या शाळांमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेतील मुलांनी राधा-कृष्ण असा विविध प्रकारचा पेहराव करून या उत्सवात सहभाग घेतला होता. बालगोपाळांनी थर लावून दहीहंडी फोडून आनंद साजरा केला.
पेणच्या प्राथमिक शाळेत बालगोपाळांची दहीहंडी
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सकाळीच पेणमधील लहान मुलांच्या शाळांमध्ये दहीहंडी उत्सव साजरा केला.
पेणच्या प्राथमिक शाळेत बालगोपाळांची दहीहंडी
दहीहंडीच्या विविध प्रकारच्या गाण्यांवर ताल धरत या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला आनंद द्विगुणित केला. फुलाफळांनी सजविलेली दहीहंडी फोडण्याची उत्सुकता देखील त्यांची तेवढीच वाढली होती. शाळेतील विद्यार्थ्यांना बालपणापासूनच शिक्षकी धडयांसोबत आपल्या सणांची व साहसी खेळाची ओळख व्हावी यासाठी दहीहंडी साजरी केली गेली. अशी माहिती यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कलावती पाटील यांनी सांगितले.
Last Updated : Aug 24, 2019, 11:08 AM IST