महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 26, 2020, 9:02 PM IST

ETV Bharat / state

सावधान..! 'गावबंदी कराल तर...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे यांसारख्या शहरांतील चाकरमानी हे पुन्हा गावाकडे येण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या भीतीने गावात बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला बंदी घालण्यात येत आहे. बंदी घालणाऱ्या गावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश रायगडच्या पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

Raigad Corona Update
रायगड कोरोना अपडेट

रायगड - जिल्ह्यात कोरोनाच्या भीतीने गावात बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला बंदी घालण्यात येत आहे. अशी बंदी घालणाऱ्या गावांतील सरपंच आणि पोलीस पाटील यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दिले आहेत.

'गावबंदी कराल तर कारवाई करणार

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना याबाबत माहिती दिली असून रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनीही ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत. गावात अशी गावबंदी केली असल्यास 100 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी केले आहे.

हेही वाचा -कोरोनाचा विषाणू शरीरात जाण्याआधीच करता येऊ शकतो डीअॅक्टिव्ह!

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून गावातील नागरिक घाबरू लागले आहेत. शासनाने सगळीकडे संचारबंदी केली असून जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांतील चाकरमानी हे पुन्हा गावाकडे येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोरोनाची लागण गावात होऊ नये या दृष्टीने जिल्ह्यातील अनेक गावांनी गावच्या वेशी बॅरिगेट्स, कुंपण, खड्डे करुन बंद केल्या आहेत. तर काहीजण गावाच्या वेशीवर बसून येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करून प्रवेश देत आहेत. मात्र, ग्रामपंचायत हद्दीत केलेली ही गावबंदी चुकीची आहे. गावात येण्याला बंदी करणाऱ्या सरपंच, पोलीस पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल. गुन्हा दाखल करूनही हा प्रकार थांबला नाही तर संबंधितांना तुरूंगातही जावे लागेल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details