रायगड - कोरोना विषाणुसंदर्भात जनजागृती करण्यासाठी जिल्हा पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. अलिबागमध्ये पोलिसांनी आता घोडयांवरून फिरत जनजागृती सुरू केलीय. त्यासाठी चार घोडे तैनात करण्यात आले आहेत. या घोड्यांवर स्वार होत पोलीस चौकाचौकात उभे राहून जनजागृती करत आहेत. तसेच विविध भागात फिरून कोरोनोबाबत काळजी घेण्यासंबंधी माहिती पुरवत आहेत.
रायगड पोलीसांची घोडयावरून जनजागृती - lockdown in raigad
अलिबागमध्ये पोलिसांनी आता घोडयांवरून फिरत जनजागृती सुरू केलीय. त्यासाठी चार घोडे तैनात करण्यात आले आहेत.
![रायगड पोलीसांची घोडयावरून जनजागृती raigad police](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6637934-701-6637934-1585839636271.jpg)
अलिबागमध्ये पोलिसांनी आता घोडयांवरून फिरत जनजागृती सुरू केलीय.
यासाठी मेगाफोनचा वापर करण्यात येतोय. घोडयावरून होणाऱया या जनजागृतीबाबत सध्या नागरीकांमध्ये कुतूहल आहे.