माहिती देताना वकील गोरख लिमन रायगड MD Drug Case : जिल्ह्यातील खोपोली हद्दीतील ढेकू या गावातील एक इलेक्ट्रिक पोल बनविण्याच्या कारखान्यात एमडी (मेफेड्रॉन) बनविण्याचा कारखाना सुरू असल्याचा संशय आल्याने, खोपोली पोलिसांनी छापा टाकून एकूण १०६ कोटी ५० लाखाचे ८५ किलो २०० ग्रॅम वजनाचे ड्रग्स, १५ लाख ३७,३७७ रु किंमितीची ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारी रसायने, ६५ लाख किंमतीची रासायनिक प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामुग्री अशा ऐवजासह तीन आरोंपीना अटक केली आहे.
अटक आरोपीची नावे:
1) कमल जयरामदास जैसवानी (वय 48), रा. थारवानी सॉलिटियर, 702, के विंग. कल्याण - मुरबाड रोड, कल्याण वेस्ट, ठाणे
2) मतीन बाबू शेख (वय 45) रा. प्लॉट नंबर 19, अब्रार कॉलनी, जि. छत्रपती संभाजीनगर
3) अथ्नोनी पाऊलोस करूकुटीकरण, (वय 54), राहणार 103 विश्राम टावर, वागळे स्टेट, ठाणे
सहा दिवसांची पोलीस कोठडी: आरोपीना आज खोपोली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 364-2023, NDPS ऍक्ट अंतर्गत खालापूर न्यायालयात हजर केले असता, सहा दिवसांची पोलीस कोठडी Police (Custody To Three Accused In MD Case) सुनावली. याबाबत आरोपीचे वकील गोरख लिमन यांनी माहिती दिली की, न्यायालयात एमडी बनविण्याच्या प्रक्रियेबाबत पोलिसांना विचारले असता पोलिसांनी कोणतीच माहिती दिली नाही. तसंच पोलिसांना सापडलेली १९ रसायने कोणती आणि एमडी बनविण्यासाठी त्यांची गरज आहे का? यावर वारंवार विचारून सुद्धा पोलिसांना उत्तर देता आले नाही. पोलिसांच्या तज्ञालाही त्याबाबत माहिती देता आली नाही. यातील २ नंबर आरोपी हा १० वी नापास आहे. तसेच पोलिसांना आरोपीची पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील सुनावणी ही १४ डिसेंबरला आहे. याबाबत पुढील तपासामध्ये काय निष्पन्न होतेय हे पाहणे महत्वाचं आहे, असं आरोपींच्या वकिलाकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा -
- New Drug Smuggler : नाशिकमध्ये ललित पाटीलनंतर 'हा' आहे नवा ड्रग्ज माफिया
- Nashik MD Drug Case : नाशिक एमडी ड्रग प्रकरणावरुन राजकारण; कनेक्शन थेट अंडरवर्ल्डशी?
- ICICI Bank Scam Case : चंदा कोचर यांच्या पुन्हा एकदा अडचणी वाढणार?, सीबीआयच्या 'या' अर्जाला न्यायालयाची परवानगी