महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सेनेचा आरेमधील झाडे तोडण्यास विरोध कायम - आदित्य ठाकरे - जन आशीर्वाद यात्रा रायगड जिल्ह्यात दाखल

'आरे'मध्ये असलेली झाडे तोडण्याच्या विरोधात आम्ही असून एमएमआरडीए आपली जबाबदारी झटकत असल्याची प्रतिक्रिया युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी माणगाव येथे दिली आहे.

जन आशीर्वाद यात्रा रायगड जिल्ह्यात दाखल

By

Published : Sep 15, 2019, 11:53 PM IST

रायगड -आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा रायगड जिल्ह्यात दाखल झाली आहे. माणगाव येथे ठाकरे यांची सभा आयोजित केली होती. यावेळी पत्रकारांनी 'आरे'मधील वृक्षतोडी बाबत प्रश्न विचारला असता ठाकरे यांनी, आपला झाडे तोडण्यास विरोध कायम असल्याचे सांगितले.

सेनेचा आरेमधील झाडे तोडण्यास विरोध कायम - आदित्य ठाकरे

हेही वाचा... भाजपवासी झालेल्या उदयनराजेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीला सल्ला, आत्मचिंतन-आत्मपरीक्षण करावे

एमएमआरडीए आपली जबाबदारी झटकत आहे - ठाकरे

मेट्रोसाठी मुंबई शहरातील तीन हजार झाडे तोडली आहेत. त्याला परवानगी देण्यात आलेली असून त्यामध्ये राजकारणही झाले आहे. मात्र 'आरे'मध्ये काही बिबटे असून त्याची नऊ पिल्लेही आहेत. त्यामुळे आरेमधील झाडे तोडण्याच्या विरोधात आम्ही असून एमएमआरडीए आपली जबाबदारी झटकत असल्याची प्रतिक्रिया युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी माणगाव येथे दिली आहे.

हेही वाचा... सातारा उमेदवारी बाबत पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे विधान, म्हणाले..​​​​​​​

जन आशीर्वाद यात्रा रायगड जिल्ह्यात दाखल...

जन आशीर्वाद यात्रा रविवारी सायंकाळी रायगड जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी पोलादपूर येथे यात्रेचे आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आदित्य ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर माणगाव येथे सभे ठिकाणी ते दाखल झाले.

हेही वाचा... खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे कॉलर उडवून स्वागत​​​​​​​

यावेळी ठाकरे यांच्या सोबत उदयोग मंत्री सुभाष देसाई, आमदार भरत गोगावले, माजी आमदार सचिन अहिर, अवधूत तटकरे, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, रायगड जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, संदीप भोईर श्रीवर्धन विधानसभा संपर्कप्रमुख आदी पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details