महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोकणात 'मविआ'चे विधानसभेत 11 आमदार; समस्या सोडविणार का ? - mahavikas aaghadi kokan latest news

कोकणात 9 उमेदवार हे शिवसेनेचे आणि दोन जण राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत निवडून गेले आहेत. कोकणात शिवसेनेची ताकद असूनही विकासाच्या दृष्टीने कोकणाला नेहमी झुकते माप मिळालेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनी कोकणच्या विकासासाठी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे.

raigad
रायगड

By

Published : Dec 5, 2019, 3:20 PM IST

रायगड -2019 च्या विधानसभा निवडणुकीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यातून 15 आमदार विधानसभेत निवडून गेले. यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या ३ पक्षांची आघाडी होऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. या महाविकास आघाडीचे कोकणातून 11 आमदार निवडून आले आहेत. तर भाजपचे 3 आणि भाजपला पाठिंबा दिलेला 1 आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनी कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणे महत्त्वाचे आहे. अन्यथा महाविकास आघाडी राज्यात असूनही कोकणातील समस्या सुटल्या नाहीत तर विकास खुंटला जाणार आहे.

महाविकास आघाडी करणार कोकणात विकास ?

कोकणात 9 उमेदवार हे शिवसेनेचे आणि दोन जण राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत निवडून गेले आहेत. कोकणात शिवसेनेची ताकद असूनही विकासाच्या दृष्टीने कोकणाला नेहमी झुकते माप मिळालेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनी कोकणच्या विकासासाठी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. कोकणात जाणारा मुंबई-गोवा महामार्ग गेल्या 10 वर्षांपासून रखडलेला आहे. महामार्ग हा कोकणच्या विकासाचा मार्ग आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन हा महामार्ग लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे.

हेही वाचा -पीएनबी घोटाळा : मेहुल चोक्सीच्या विरोधातील कारवाईला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

महामार्ग खड्डेमय झाला असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. आरोग्य सेवा विस्कळीत झाली असल्याने अनेकांना आपले प्राण गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या महामार्गावरील रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यात सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयाची नितांत गरज आहे. अद्ययावत रुग्णालय नसल्याने जखमींना मुंबई, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात उपचारासाठी हलवावे लागत असते.

कोकणात भातशेती, मच्छीमारी, आंबा, काजू उत्पादन घेतले जाते. मात्र, निसर्गाच्या आपत्तीने कोकणातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. शासनाकडून मात्र, तुटपूजी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत असते. तरीही कोकणातील शेतकरी आत्महत्या करीत नाही. शेतकऱ्यांच्या समस्येबाबत आमदारांनी विधानसभेत लक्ष वेधून प्रश्न सोडविणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर कोकणातील शिक्षण, रोजगार, बेरोजगारी, पाणी, कोकण रेल्वे हे प्रश्नही अनेक वर्षे प्रलंबित आहेत. याकडेही लक्ष देऊन आमदारांनी समस्या सोडविणे गरजेचे आहे.

हेही वाचा -कर्नाटक पोटनिवडणूक : १५ जागांसाठी मतदान सुरू, सत्ताधारी भाजपची कसोटी

कोकणातील तिन्ही जिल्ह्यात विविध समस्या आहेत. म्हणून आताच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोकणातील आमदारांनी एकत्रित येऊन येथील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे आहे. तरच खुंटलेला कोकणचा विकास साधला जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details