महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रेमविवाह केलेल्या मुलीला कुटुंबीयांची 'भावपूर्ण श्रद्धांजली'; रायगडमध्ये रंगले नाट्य - raigad flex news

30 ऑक्टोबरला एका तरुण जोडप्याने सहसंमतीने प्रेम विवाह केला. तसेच यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन विवाह झाल्याची माहिती दिली. मात्र, हा विवाह मुलीच्या भावाला व त्याचा मित्रांना मान्य नसून, मुलीच्या भावाने शहरातील एका स्थानिकाला सोबत घेऊन चक्क 'ती आमच्यासाठी मेली', असे जाहीर करून कुटुंबातर्फे भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर लावले.

पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या मुलीला कुटुंबीयांची 'भावपूर्ण श्रद्धांजली'

By

Published : Nov 2, 2019, 5:26 PM IST

रायगड - एका तरुणीने प्रेमविवाह केल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी 'मुलगी आमच्यासाठी मेली असून, तिला भावपूर्ण श्रद्धांजली' देत असल्याचे बॅनर लावले आहेत. म्हसळा शहरात लावण्यात आलेल्या या बॅनर्समुळे संबंधित मुलीचे मानसिक खच्चीकरण झाले असून, तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या मुलीला कुटुंबीयांची 'भावपूर्ण श्रद्धांजली'

30 ऑक्टोबरला एका तरुण जोडप्याने सहसंमतीने प्रेम विवाह केला. तसेच यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन विवाह झाल्याची माहिती दिली. मात्र, हा विवाह मुलीच्या भावाला व त्याचा मित्रांना मान्य नसून, मुलीच्या भावाने शहरातील एका स्थानिकाला सोबत घेऊन चक्क 'ती आमच्यासाठी मेली', असे जाहीर करून कुटुंबातर्फे भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर लावले.

1 नोव्हेंबरला लावलेले बॅनर काढल्यानंतर पुन्हा 2 नोव्हेंबरच्या पहाटे याच आशयाचे बॅनर लावण्यात आल्याने शहरातील हिंदू समाज आक्रमक झाला आहे. मृत्यू पावण्याआधीच श्रद्धांजली दिल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, या प्रकरणी बॅनर छपाई करणार्‍यासह ते लावणार्‍यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी हिंदू समाजातील शेकडो कार्यकर्त्यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात केली.

मुलीच्या भावासह व त्याच्या मित्रांनी बॅनरबाजीचे प्रकरण सुरू ठेवल्याने दोन दिवसांनाधीच लग्न झालेल्या या तरुणीने थेट विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवला असून, तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details