महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील 'ऑक्सिजन प्लांट' गुदमरतोय - सेंट्रल ऑक्सिजन सिस्टम प्लांट

सेंट्रल ऑक्सिजन सिस्टम प्लांट हा ऑपरेट करण्यासाठी तज्ज्ञांची गरज होती. मात्र, तसा तज्ज्ञ ऑपरेटर अद्यापही नियुक्त केला गेला नाही. त्यामुळे आज हा प्लांट धूळखात पडलेला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील धुळखात पडलेला ऑक्सिजन प्लांट

By

Published : Jul 16, 2019, 4:50 PM IST

रायगड -जिल्हा सामान्य रुग्णालयात साधारण 15 लाख रुपये खर्च करून सेंट्रल ऑक्सिजन सिस्टम प्लांट तयार करण्यात आला. सेंट्रल ऑक्सिजन सिस्टम प्लांट सुरू झाल्यानंतर पाच ते सहा महिने सुरू होता. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून हा प्लांट बंद अवस्थेत धूळखात पडला आहे. त्यामुळे आता या ऑक्सिजन प्लांटलाच ऑक्सिजनची गरज भासत आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील धुळखात पडलेला ऑक्सिजन प्लांट

जिल्हा सामान्य रुग्णालय हे सर्व सामान्य नागरिकांची संजीवनी आहे. जिल्ह्यातून हजारो रुग्ण जिल्हा सामान्य रुगणालायत उपचारासाठी येत असतात. जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता विभाग, अतिदक्षता बाल विभाग हे महत्वाचे विभाग आहेत. या तिन्ही विभागात येणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनची नितांत गरज असते. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने सेंट्रल ऑक्सिजन सिस्टम प्लांट उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव ठेवला होता.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हा रुग्णालयाच्या तळमजल्यावर असलेल्या एका खोलीमध्ये सेंट्रल ऑक्सिजन सिस्टम प्लांट बसवण्यात आला. यामधून अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता बाल कक्ष या विभागात ऑक्सिजन सप्लाय करणाऱ्या नऊ लाइन टाकण्यात आल्या. त्यानंतर हा प्लांट सुरूही झाला. मात्र, ५-६ महिने झाल्यानंतर लाइनमधून ऑक्सिजन लिकेज होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे प्लांटला जोडलेल्या सहा ऑक्सिजन बाटल्या लवकर रिकामे होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हा प्लांट पाच वर्षांपासून बंद अवस्थेत पडलेला आहे.

सेंट्रल ऑक्सिजन सिस्टम प्लांट हा ऑपरेट करण्यासाठी तज्ज्ञांची गरज होती. मात्र, तसा तज्ज्ञ ऑपरेटर अद्यापही नियुक्त केला गेला नाही. त्यामुळे आज हा प्लांट धूळखात पडलेला आहे. मात्र, प्लांट बंद असला तरी अतिदक्षता विभागातील रुग्णांना ऑक्सिजन सुविधा मिळत आहे. त्यामुळे सध्या तरी या ऑक्सिजन प्लांटकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

सेंट्रल ऑक्सिजन सिस्टम प्लांट उभारण्यासाठी प्रशासनाचे लाखो रुपये खर्च झाले असून बंद अवस्थेत धूळखात पडलेल्या या ऑक्सिजन प्लांटलाच आता श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details