महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राहुल गांधींच्या आदेशानंतर रायगड जिल्हा युवक काँग्रेसने दिला वायनाडच्या 19 जणांना मदतीचा हात

रायगड जिल्ह्यात संचारबंदीमुळे परराज्यातील हजारो नागरिक अडकून पडले आहेत. खासदार राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघातील १९ जण अडकले आहेत. सर्वे गावात असलेल्या प्रकृती रिसॉर्टमधील 2 आणि पनवेलच्या मोर्बा येथे 17 जण असे वायनायडचे एकूण १९ नागरिक आहे. सर्वेमधील अडकलेल्या नागरिकांनी वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी यांच्याशी संपर्क करून गावी पोहचण्यासाठी मदत करण्यास विनंती केली.

Citizens of Wayanad
वायनाडचे नागरिक

By

Published : May 12, 2020, 3:38 PM IST

रायगड - रायगड जिल्ह्यात अडकलेल्या केरळच्या वायनाड येथील 19 जणांना खासदार राहुल गांधी आणि प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वायनाडला जाण्याची व्यवस्था करण्यात आली. रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. प्रथमेश पाटील यांनी या नागरिकांसाठी बसची व्यवस्था केली आहे.

रायगड जिल्ह्यात संचारबंदीमुळे परराज्यातील हजारो नागरिक अडकून पडले आहेत. खासदार राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघातील १९ जण अडकले आहेत. सर्वे गावात असलेल्या प्रकृती रिसॉर्टमधील 2 आणि पनवेलच्या मोर्बा येथे 17 जण असे वायनायडचे एकूण १९ नागरिक आहे. सर्वेमधील अडकलेल्या नागरिकांनी वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी यांच्याशी संपर्क करून गावी पोहचण्यासाठी मदत करण्यास विनंती केली.

खासदार राहुल गांधी यांना संपर्क केल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यालयातून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांना याबाबत माहिती कळवली. त्यानंतर सत्यजित तांबे यांनी रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. प्रथमेश पाटील यांना या नागरिकांची माहिती दिली. प्रथमेश पाटील यांनी 19 जणांची माहिती आणि कागदपत्रे गोळा करून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करून त्यांचे पास तयार केले. तर केरळमधील युवक काँग्रेसने या 19 जणांची राज्यात येण्याची परवानगी काढून घेतली.

वायनाडच्या 19 जणांचे पासेस तयार झाल्यानंतर सर्वे येथील दोघांना कारने पनवेल येथे सोडून तेथून सर्व 19 जणांना खासगी बसने वायनाडकडे रवाना केले. 13 मे रोजी पहाटेपर्यंत हे सर्व नागरिक आपल्या गावी सुखरूप पोहचणार आहेत. युवक काँग्रेसने केलेल्या मदतीबाबत खासदार राहुल गांधी, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अॅड. प्रथमेश पाटील यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details