रायगड - जिल्ह्यातील 15 पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाची निवडणूक सोमवारी पार पडली. पंचायत समितीमध्ये प्रत्येक पक्षाने आपली सत्ता राखण्यात यश मिळविले आहे. जिल्ह्यात शेकाप 6, शिवसेना 5, राष्ट्रवादी काँग्रेस 3, भाजप 1 अशा 15 पंचायत समितीत विविध पक्षांना यश मिळाले आहे. तर शेकाप हा 6 पंचायत समितीवर सत्ता काबीज करून प्रथम क्रमांकावर राहिला आहे. अलिबाग पंचायत समिती निवडणूकही बिनविरोध न होता मतदान प्रक्रियेने पार पडली. माणगाव पंचायत समिती सभापती पद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने उमेदवार नसल्याने रिक्त राहिले आहे.
रायगडमधील पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणूक : शेकाप प्रथम क्रमांकावर जिल्ह्यातील 15 पंचायत समितीचा अडीच वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर नवीन आरक्षण जाहीर झाले होते. यामध्ये 7 महिला, 4 सर्वसाधारण, 2 नामप्र, 2 अनुसूचित जमाती असे आरक्षण पडले होते. सोमवारी सकाळी सभापती, उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दुपारी 2 वाजता पंचायत समिती सभागृहात निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली.
हेही वाचा -विरोधकांचे खोटे बोलून झाले, आता काम करु द्या - आदित्य ठाकरे
अलिबाग पंचायत समितीमध्ये शेकापने सभापती, उपसभापती पदासाठी उमेदवार दिले. शिवसेनेने सभापती तर भाजपने उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध न होता हात उंचावून मतदान पार पडले. यामध्ये शेकापचे प्रमोद ठाकूर सभापती तर मीनल माळी उपसभापती म्हणून निवड झाली. माणगाव येथील सभापती पद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने याठिकाणी उमेदवार नसल्याने सभापती पद रिक्त राहिले आहे. तर शिवसेनेचे उपसभापती राजेश पानवकर यांच्याकडे प्रभारी पद देण्यात आलेले आहे.
हेही वाचा -शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीची गुलाम झाली आहे का? रामदास आठवले यांचा सवाल
पंचायत समिती सभापती/उपसभापती पुढीलप्रमाणे -
- अलिबाग (शेकाप) - प्रमोद ठाकूर, सभापती, मीनल माळी, उपसभापती
- उरण (शेकाप) - अॅड सागर कडू, सभापती, शुभांगी पाटील, उपसभापती
- पोलादपूर (शेकाप) - नंदाताई चांदे, सभापती, शैलेश सलागरे, उपसभापती
- रोहा (शेकाप) - गुलाब वाघमारे, सभापती (शेकाप), रामचंद्र सकपाळ (राष्ट्रवादी काँग्रेस)
- खालापूर (शेकाप) - वृषाली पाटील, सभापती, विश्वनाथ पाटील, उपसभापती
- पेण (शेकाप) - सरिता म्हात्रे, सभापती, सुनील गायकर, उपसभापती
- तळा (राष्ट्रवादी काँग्रेस) - देविका लासे, सभापती, गणेश वाघमारे, उपसभापती
- मुरुड (राष्ट्रवादी काँग्रेस) - आशिका ठाकूर, सभापती, चंद्रकांत मोहिते, उपसभापती
- म्हसळा (राष्ट्रवादी काँग्रेस) - उज्वला सावंत, सभापती, मधू गायकर, उपसभापती
- माणगाव (शिवसेना) - सभापती पद रिक्त, राजेश पानवकर, उपसभापती
- महाड (शिवसेना) - ममता गांगण, सभापती, सदानंद मांडवकर, उपसभापती
- सुधागड (शिवसेना) - नंदू सुतार, सभापती, उज्वला देसाई, उपसभापती
- कर्जत (शिवसेना) - सुजाता मनवे, सभापती, भीमाबाई पवार, उपसभापती
- श्रीवर्धन (शिवसेना) - बाबुराव चोरगे, सभापती, सुप्रिया गोवारी, उपसभापती