महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा प्रशासनाने बनवलेल्या 'कोरोना को हराना है' या जागृतीपर गाण्याची जिल्ह्यात धूम

जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाण्यांमधून जागृती सुरू केली आहे. 'कोरोना को हराना है' हे स्पेशल अँथम साँग बस कर प्रॉडक्शन मार्फत तयार करण्यात आलेले आहे. या गीताला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

जिल्हा प्रशासनाने बनविलेल्या 'कोरोना को हराना है' या जागृतीपर गाण्याची जिल्ह्यात धूम
जिल्हा प्रशासनाने बनविलेल्या 'कोरोना को हराना है' या जागृतीपर गाण्याची जिल्ह्यात धूम

By

Published : Apr 27, 2020, 12:37 PM IST

रायगड - कोरनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर उपाययोजना राबवल्या जात आहेत. यामध्ये जिल्हा प्रशासनानेही 'कोरोना को हराना है' हे जागृतीपर गीत बनवले असून या गाण्याला नागरिकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.

जिल्हा प्रशासनाने बनविलेल्या 'कोरोना को हराना है' या जागृतीपर गाण्याची जिल्ह्यात धूम

कोरोनाची लढाई ही सध्या शासन, प्रशासन पूर्ण ताकदीने लढत आहे. या लढाईत जनतेची साथ ही महत्वाची आहे. रायगड जिल्हा प्रशासनही कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेला वारंवार आवाहन करत आहे. यासाठी वेगवेगळ्या कल्पनादेखील प्रशासनामार्फत राबविण्यात येत आहे. अशीच एक कल्पना जिल्हा प्रशासनाने गाण्यांमधून राबवली आहे. 'कोरोना को हराना है' हे स्पेशल गाणे साँग बस कर प्रॉडक्शन मार्फत तयार करण्यात आलेले आहे. या गीताला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details