महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड: शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये राडा; शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांना मारहाण - दोन गटात तुफान मारहाण रायगड

जिल्ह्यातील माणगाव निजामपूर भागात असलेल्या पोस्को कंपनीतील भंगार सामान उचलण्याच्या ठेक्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांना टोळक्याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये राडा
शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये राडा

By

Published : Apr 27, 2021, 4:01 PM IST

रायगड -जिल्ह्यातील माणगाव निजामपूर भागात असलेल्या पोस्को कंपनीतील भंगार सामान उचलण्याच्या ठेक्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांना टोळक्याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

भंगार उचलण्याच्या कत्राटावरून वाद

माणगाव निजामपूर परिसरात विळे भागड येथे पोस्को ही पोलाद निर्मित कंपनी उभारण्यात आलेली आहे. या कंपनीतून निघणारे वेस्टेज हे राजकीय नेत्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. वेस्टेज भंगार उचलण्याचा ठेका मिळावा यासाठी जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांकडून प्रयत्न केला जातो. यात राष्ट्रावादी आणि शिवसेना पक्षातील नेते व कार्यकर्ते कायमच आघाडीवर असतात. त्यामुळे या दोन गटात अनेकदा वाद होत असतात. दोन दिवसांपूर्वी देखील असाच वाद झाला. यात शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांना टोळक्याकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दोन गटांमध्ये तुफान राडा

परस्परविरोधी तक्रार दाखल

पोस्को कंपनी परिसरात दोन दिवसांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली. यामध्ये शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांना टोळक्याकडून मारहाण करण्यात आली. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details