रायगड - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात एका खासगी वृत्तवाहिनीचे संपादक आणि मालकअर्णब गोस्वामी यांच्यासह दोन जणांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र, आज रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या जिल्हा सत्र न्यायालयातील पुनर्विचार याचिका आणि जामीन अर्जावर आज 23 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. तर अर्णबच्या वकिलांनी सत्र न्यायालयातील जामीन अर्ज काढुन घेतला असला तरी फिरोज शेख आणि नितेश सरडा यांनी जिल्हा सत्र न्यायालयातील जामीन अर्ज काढलेला नाही. त्यामुळे त्याच्या अर्जावरही आज याबाबत निकाल येण्याची शक्यता आहे.
पुनर्विचार याचिका आणि जामिनावर आज 23 नोव्हेंबरला सुनावणी -
उच्च न्यायालयात अंतरिम जामीन हा अर्णब गोस्वामी याचा फेटाळला. त्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून तिघांना अंतरिम जामीन अर्ज मंजूर केला आहे. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असलेल्या रायगड पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेवर आणि दोघांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पुढे ढकलण्यात आली होती. यानंतर आज याबाबत सुनावणी होणार आहे.
हेही वाचा -जनतेची जबाबदारी माझ्यावर, हे उघडा ते उघडा म्हणणाऱ्यांवर नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला