महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड; जिल्हाधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली 'कोविडशिल्ड लस' - raigad covid vaccination news

पहिल्या टप्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांना १६ जानेवारीपासून कोविडशिल्ड लस देण्यास सुरुवात झाली. ८ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंद केली असून आत्तापर्यंत साडेचार हजार जणांनी कोविडशिल्ड लस घेतली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली 'कोव्हीशिल्ड लस'
जिल्हाधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली 'कोव्हीशिल्ड लस'

By

Published : Feb 10, 2021, 8:03 AM IST

Updated : Feb 10, 2021, 8:23 AM IST

रायगड - डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांना कोव्हीशिल्ड लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू झाली. या मोहीमेअंतर्गत नोंदणी केलेल्या १०९१ कर्मचारी तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. रागडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी मैनक घोष, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. मेश्राम यांनी पहिल्या टप्यात 'काेविशिल्ड' लस घेतली.

जिल्हाधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली 'कोविडशिल्ड लस'


पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस

पहिल्या टप्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांना १६ जानेवारीपासून कोविडशिल्ड लस देण्यास सुरुवात झाली. ८ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंद केली असून आत्तापर्यंत साडेचार हजार जणांनी कोविडशिल्ड लस घेतली आहे. जिल्ह्यात २० हजार लसीचा साठा उपलब्ध आहे. दुसऱ्या टप्यात महसूल, पोलीस, स्वच्छता कर्मचारी या फ्रंट वर्कर्सना लसीकरण करण्यात येणार होते. त्यानुसार आजपासून (बुधवार) महसूल विभागापासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली 'कोविडशिल्ड लस'
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली पहिली लसअलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या लसीकरण कक्षात जिल्हाधिकारी निधी चौधरी, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी मैनक घोष, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. मेश्राम यांनी कोव्हीशिल्ड लस घेतली. महसूल विभागातील 1091 जणांची कोविन ऍप मध्ये नोंदणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली 'कोविडशिल्ड लस'
लस घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनकोविडशिल्ड लसीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका. शासनाच्या कोरोनाच्या नियमाचे पालन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
Last Updated : Feb 10, 2021, 8:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details