रायगड -हवामान खात्याने ७२ तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असल्याने नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना केले आहे. तर शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - रायगड जिल्हाधिकारी
हवामान खात्याने ७२ तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असल्याने नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना केले आहे.
शनिवार, रविवार व सोमवार या तीन दिवसात अतिवृष्टीचा ईशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. रायगड परिसरात पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. पुरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूप स्थळी हलवण्याचे काम शासकीय यंत्रणेकडून सुरू आहे. तसेच खारघर पांडवकडा येथे ४ जण बुडाले आहेत. त्यामध्ये ३ जणांचे मृतदेह हाती आले आहेत.
जिल्ह्यातील धबधबे, समुद्र किनारी जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. सखल भागात असलेल्या लॉज व हॉटेलवर आलेल्या पर्यटकांना आजच आपल्या स्थळी निघून जाण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून कुठे अडकण्याची शक्यता नाही. असे डॉ विजय सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.