रायगड - तारिक गार्डन इमारतीत अडकलेल्या शेवटच्या व्यक्तीस 38 तासानंतर मृतावस्थेत बाहेर काढण्यात आले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार अडकलेल्या सर्व व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे. अडकलेल्यांचे शोधकार्य आता थांबवले असले तरी सायंकाळपर्यंत येथील मातीचा ढिगारा काढण्याचे काम सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले आहे.
महाड इमारत दुर्घटना : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले, शोधकार्य थांबले - nidhi chaudhary on building collapsed
महाडमधील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली होती. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या शेवटच्या व्यक्तीस 38 तासानंतर मृतावस्थेत बाहेर काढण्यात आले आहे.
महाड इमारत दुर्घटना : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व व्यक्तींना काढले बाहेर
महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली होती. इमारतीत ४७ कुटुंबं राहत होती. या दुर्घटनेत एकूण १७ जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला आहे.