महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचावकार्य सुरूच - mahad building collapse news

महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

Raigad building collapse live updates: Death toll rises to four
LIVE महाड इमारत दुर्घटना : ८ जणांचा मृत्यू; १८ तासांनंतर ४ वर्षीय मुलाला बाहेर काढण्यात यश

By

Published : Aug 25, 2020, 3:49 PM IST

Updated : Aug 26, 2020, 6:32 AM IST

रायगड- महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्यात सुमारे अनेक जण अडकल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीत 47 कुटुंबं राहत होती. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांकडून बचावकार्य सुरू आहे.

LIVE UPDATES :

  • मृतांमध्ये आणखी एकाची वाढ, बचावकार्य सुरूच
  • तब्बल 26 तासांनंतर मेहरुनिस्सा काझी या 65 वर्षीय महिलेला वाचवण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश
  • आणखी दोघांचे मृतदेह सापडले, मृतांचा आकडा 12 वर
  • राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर
  • मृतांची नावे - नाविद झमाने (वय 25), नौशीन नदीम बांगी (वय 35), आदी शेखनाग (वय 14), मतीन मुकादम (वय 17), फातिमा शौकत अलसुलकर (वय 58), रोशनबी दाऊदखान देशमुख (वय 70) इसमत हसीम शेखनाग (वय 35 वर्ष), फातिमा शाफिक अन्सारी (वय 43), यासह दोघे
  • मृतांची संख्या वाढली, एकूण मृतसंख्या 10 वर
  • आणखी मृतांचा आकडा वाढला, एकूण मृत संख्या 8 वर
  • मृतांचा आकडा वाढला, एकूण चार जणांचा मृत्यू
  • मोहम्मद बांगीच्या दोन बहिणींचा शोध सुरू
  • मोहम्मद बांगी या 4 वर्षीय मुलाला तब्बल 18 तासांनंतर वाचवण्यात यश
    मोहम्मद बांगी या 4 वर्षीय मुलाला तब्बल 18 तासांनंतर वाचवण्यात यश
  • इमारतीच्या मलब्यातून अठरा तासानंतर पहिला मृतदेह बाहेर, एनडीआरफला यश
  • तपासपथके आरोपींच्या शोधासाठी रवाना - महाड पोलीस निरीक्षक शैलेश सणस
  • आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे, वास्तुविशारद गौरव शहा, तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंदाड, अभियंता शशिकांत दिघे यांच्यावर गुन्हा दाखल
  • पीडित कुटुंबीयांच्या दु:खात सामील असून शक्य ते मदतकार्य त्वरित पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

अठरा तासांनंतर पहिला मृतदेह बाहेर, अद्याप 17 जण अडकले

तब्बल अठरा तासांनंतर पहिला मृतदेह काढण्यात एनडीआरएफ तसेच स्थानिक प्रशासनाला यश आले आहे. नाविक जावेद जोमाने (30) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अद्याप 17 जणांचा शोध सुरू आहे. नाविक जोमाने याचे इमारतीत कार्यालय होते. दुपारी तो कार्यालयात झोपला होता. त्यानंतर ही घटना घडली. 18 तासानंतर त्याचा मृतदेह काढण्यात यश आले आहे. नाविक याचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.

गृहमंत्री अमित शहांचे ट्वीट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संबंधित दुर्घटनेसंदर्भात ट्वीट केले आहे. रायगडमध्ये इमारत कोसळणे ही अत्यंत शोकांतिक घटना असल्याने त्यांनी म्हटले आहे. एनडीआरएफच्या महासंचालकांशी बोलून सर्व माहिती घेतल्याचे त्यांनी सांगितले. शक्य ती सर्व मदत देण्यासाठी पथके वाटेवर आहेत आणि शक्य तितक्या लवकर बचाव कार्यात त्यांना मदत केली जाईल, असे ते म्हणाले. शाह यांनी प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली आहे.

बचावकार्य सुरू असतानाची दृश्य...

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

जमीनदोस्त झालेल्या इमारतीच्या बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फारूक काझी आणि युनूस शेख अशी त्यांची नावं आहेत. अद्याप दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यासोबतच पोलिसांनी आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे, वास्तुविशारद गौरव शहा, तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंदाड तसेच अभियंता शशिकांत दिघे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Last Updated : Aug 26, 2020, 6:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details