रायगड (महाड)-महाड एमआयडीसीमधील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात ३ जण ठार झाले तर २जण गंभीर जखमी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. काही कामगार कंपनीत अडकले होते. महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. आज ४ तारखेला सकाळी ३ मृतदेह बाहेर काढण्यात आले.
- महाड औद्योगिक वसाहतीच्या अतिरिक्त क्षेत्रामध्ये असलेल्या के फोर/ एक या कंपनीमध्ये शुक्रवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटानंतर कंपनीत आगीचे लोण पसरल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
स्फोटाच्या मालिकेमुळे अग्नीशमन दलाला अडथळे-गेल्या अर्ध्या तासापासून येथे सुरू असलेल्या आगीच्या व स्फोटाच्या व वायू गळतीच्या शक्यतेच्या कारणामुळे प्रत्यक्ष घटनास्थळी जाण्यात अग्निशमन दल मार्ग व संबंधित शासकीय यंत्रणांना विलंब होत असल्याचे सांगण्यात आलं. यासंदर्भात प्राप्त झालेल्या स्थानिक वृत्तानुसार कारखान्यामध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना मोठ्या दुखापती होऊन मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या संदर्भात कोणताही अधिकृत खुलासा हा संबंधित कारखाना अथवा स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेला नाही. आगीचे वृत्त समजताच महाड फायर स्टेशनच्या पथकासह शेजारील कारखान्यातील अग्निशमन बंब तसेच मार्गच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र कारखान्यामध्ये सुरू असलेल्या स्फोटाच्या मालिकेनं प्रत्यक्ष घटनास्थळापर्यंत जाता येत नसल्याचेही दिसून येत आहे.