रायगड - तळ कोकणात पावसाचे आगमन झाले असले तरी रायगड मात्र अजून पावसाच्या प्रतिक्षेतच आहे. रायगडात पाऊस कधी सुरू होणार याकडे नागरिकांसह शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पावसाने दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर वादळ शमल्यानंतर पुन्हा रायगडकरांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. पाऊस उशिरा असल्याने शेतीची कामेही खोळंबली आहेत.
रायगडकर चातकासारखी पाहत आहे पावसाची वाट; शेतीची कामेही खोळंबली - preious week
कोकणात बऱ्याच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी रायगडमध्ये मात्र अद्याप पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पुन्हा रायगडकरांना घामाछ्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
![रायगडकर चातकासारखी पाहत आहे पावसाची वाट; शेतीची कामेही खोळंबली](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3624899-thumbnail-3x2-raigad.jpg)
पाऊस यावेळी उशिरा असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. दरवर्षी जून महिन्यात सात तारखेपासून पावसाळा सुरू होत असे. मात्र जून महिना अर्धा संपला तरी पावसाने रायगडकरांना उपेक्षित ठेवले आहे. दहा जूनपासून अरबी समुद्रात वायू चक्रीवादळ आले असल्याने रायगडमध्ये पावसाने सुरुवात केली होती. मात्र वादळ संपल्यानंतर पावसाने पुन्हा पाठ फिरवली आहे.
तळ कोकणात पावसाने सुरुवात केली असल्याने रायगडातही पावसाचे आगमन होईल, असे वाटत होते. मात्र अद्यापही पावसाचे आगमन झालेले नाही. पाऊस उशिरा असल्याने शेतकऱ्यांनाही शेतीची कामे सुरू करण्यात अडचणी येत आहेत. पाऊस सुरू झाला नसल्याने पुन्हा रायगडकरांना उन्हाची झळ सहन करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक आकाशाकडे डोळे लावून बसले असून पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.