महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अर्णब प्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी वकील मांडणार म्हणणे - रायगड अर्णब गोस्वामी न्यूज

आरोपीच्या वकिलांनी काल आरोपीवर लावलेल्या कलमाबाबत जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद केला आहे. या युक्तिवादावर आज सरकारी वकील हे आपले म्हणणे मांडणार आहेत. त्यामुळे आज जिल्हा सत्र न्यायाधीश सरकार पक्षाचे म्हणणे ऐकून घेऊन उद्या गुरुवारी पुनर्विचार याचिका आणि जामीन अर्जावर निकाल देणार आहेत.

अर्णब गोस्वामी न्यूज
अर्णब गोस्वामी न्यूज

By

Published : Nov 11, 2020, 12:13 PM IST

रायगड - जिल्हा सत्र न्यायालयात आज आरोपी अर्णब गोस्वामी यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावर सरकार पक्षातर्फे म्हणणे मांडण्यात येणार आहे. दुसरीकडे उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळला असल्याने अर्णब गोस्वामी याच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याबाबत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आरोपीच्या वकिलांनी काल आरोपीवर लावलेल्या कलमाबाबत जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद केला आहे. या युक्तिवादावर आज सरकारी वकील हे आपले म्हणणे मांडणार आहेत. त्यामुळे आज जिल्हा सत्र न्यायाधीश सरकार पक्षाचे म्हणणे ऐकून घेऊन उद्या गुरुवारी पुनर्विचार याचिका आणि जामीन अर्जावर निकाल देणार आहेत.

हेही वाचा -जर्किनवरून लावला चोराचा शोध.. 5 सोनसाखळ्यांसह अटक, वाहन चोरीचेही 6 गुन्हे उघड

सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी धाव

उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला आहे. याबाबत अर्णब यांची पत्नीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जामीन अर्जाबाबत सर्वोच्च न्यायालयात दुपारनंतर सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मिळणार काय?

आज दुपारी सर्वोच्च न्यायालयात अर्णब यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. मात्र या याचिकेविरोधात राज्य सरकारनेही केविट दाखल केले आहे. त्यामुळे न्यायालयाला राज्य सरकारची बाजूही ऐकून घेऊन त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा -मुंबई : मल्टिप्लेक्स, सिनेमागृह, मराठी नाटकांच्या करमणूक शुल्कात ५ ते ६ पट वाढीचा प्रस्ताव

ABOUT THE AUTHOR

...view details