महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपापेक्षा इंग्रजांचा काळ बरा होता... शेकापचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - शेतकरी कामगार पक्ष मोर्चा बातम्या

केंद्र सरकारचे कृषी, कामगार विधेयक हे शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावणारे असल्याची टीका शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. भाजपाने जनतेची दिशाभूल केली असून त्यापेक्षा इंग्रजांचा काळ बरा होता, असे पाटील म्हणाले.

शेतकरी कामगार पक्ष मोर्चा
भाजपापेक्षा इंग्रजांचा काळ बरा होता... शेकापचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By

Published : Nov 26, 2020, 5:44 PM IST

रायगड - केंद्र सरकारचे कृषी, कामगार विधेयक हे शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावणारे असल्याची टीका शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. भाजपाने जनतेची दिशाभूल केली असून त्यापेक्षा इंग्रजांचा काळ बरा होता, असे पाटील म्हणाले.

कामगार विधेयक हे शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावणारे असल्याची टीका शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केली
शेकापचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
केंद्र सरकारने कृषी आणि कामगार विधेयक मंजूर केल्यानंतर देशात असंतोष पसरला आहे. शेतकरी कामगार पक्षाने या विधेयकाविरोधात आज विराट मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. यावेळी कार्यकर्ते, महिला वर्ग मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी झाले होते. शेतकरी भवन येथून मोर्चा सुरू झाला. अरुणकुमार वैद्य शाळेजवळ मोर्चा आला असता पोलिसांनी अडवला. त्यानंतर मोर्च्याचे सभेत रुपांतर झाले. सभा संपल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
भाजपापेक्षा इंग्रजांचा काळ बरा होता... शेकापचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
केंद्र सरकार शेतकरी, कामगार याना देशोधडीला लावत आहे
केंद्राने शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. केंद्र सरकार राज्यांचे अधिकार काढण्याचे काम करत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही अस्थिर करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. केंद्राकडून देण्यात येणारी जीएसटीही अद्याप राज्याला दिली नाही. केंद्र सरकार ईडी, एन ए आय, आयबी यासारख्या नियंत्रित यंत्रणाचा गैरवापर करून विरोधी पक्षावर दबाव आणत असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.

चालत मंत्रालयावर जाणार

पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील हे जनतेच्या प्रश्नासाठी मंत्रालयावर चालत गेले होते. आता मी देखील या वयात मंत्रालयावर जाण्यासाठी मनाची गाठ बांधली आहे, असे जयंत पाटील म्हणाले. जिल्ह्यात अनेक प्रकल्प येऊ लागले आहेत. या प्रकल्पासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेण्यात येत आहेत. मात्र जोपर्यंत स्थानिक तरुणांना नोकरी देण्याची लेखी हमी दिली जात नाही. तोपर्यत जमिनीवर पाऊल ठेऊ दिले जाणार नाही, असा इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे.

या आहेत मागण्या

केंद्र सरकारने शेतकरी कायदे मागे घेणे

तत्कालीन भाजपा सरकारने लागू केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यावी

स्वामिनाथन आयोग लागू करा

कामगार विरोधी कायदे मागे घ्या

राज्य सरकारने राज्यात कामगार कायद्यांची अंमलबजावणी करू नये

वीज विधेयक 2020 त्वरित मागे घ्यावे

कोरोना काळातील वीज बिलं रद्द करावी

लँड सिलिग ऍक्ट कायम ठेवा

रायगडातील सिडको, विमानतळ अंतर्गत घेतलेल्या जमीन मालकांना बारा टक्के भूखंड दिला आहे. तसाच तो रोहा, मुरुड, कर्जत, श्रीवर्धन येथे येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना द्या.

प्रकल्पात स्थानिकांना नोकऱ्या आधी द्या

ABOUT THE AUTHOR

...view details