महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खाजगी डॉक्टर उरणकारांसाठी ठरताहेत देवदूत - रायगड कोरोनो न्यूज

उरण तालुका कोव्हिड हेल्थ केअर सेंटरमध्ये अपुरी कर्मचारी व्यवस्था असल्याने, उरणच्या खाजगी डॉक्टरांनी या केंद्रामध्ये मोफत सेवा देत आहे. येथील रुग्णांसाठी स्वखर्चातून आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिले आहेत. या सेंटरमध्ये 47 बेड हे ऑक्सिजन बेड आहेत. मात्र येथे आयसीयू बेडची व्यवस्था नसल्याने, रुग्णांना उपचारासाठी बाहेर जावे लागते. मात्र ही व्यवस्था येथेच उपलब्ध झाल्यास येथील रुग्ण येथेच बरा होऊन घरी जाऊ शकतो. अशी व्यवस्था उरणमध्ये होणे गरजेचे आहे.

uran corona update
खाजगी डॉक्टर उरणकारांसाठी ठरताहेत देवदूत

By

Published : May 9, 2021, 1:57 PM IST

उरण (रायगड) - तालुका कोव्हिड हेल्थ केअर सेंटरमध्ये अपुरी कर्मचारी व्यवस्था असल्याने, उरणच्या खाजगी डॉक्टरांनी या केंद्रामध्ये मोफत सेवा देत आहेत. आता हेच डॉक्टर आणखी पुढे येऊन येथील रुग्णांसाठी स्वखर्चातून आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे रुग्णांना अधिक चांगली रुग्णसेवा मिळत असल्याने, हे डॉक्टर आता उरणकरांसाठी देवदूत ठरत आहेत.

खाजगी डॉक्टर उरणकारांसाठी ठरताहेत देवदूत

कोव्हीड हेल्थ केअर केंद्राला अत्यावश्यक मशीन भेट -

उरण तालुक्यासाठी सिडको ट्रेनिंग सेंटर येथे तालुका कोव्हीड हेल्थ केअर सेंटर तयार करण्यात आले होते. मात्र येथे एक डॉक्टर आणि एक नर्स यांच्या जीवावर उरणकरांच्या जीवाची बाजी लागली होती. याची दखल घेत उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन या खाजगी डॉक्टर संघटनेने या केंद्रामध्ये मोफत सेवा देण्याचा निर्णय घेऊन, हे काम 30 डॉक्टरांच्या मदतीने 3 शिफ्टमध्ये सुरू आहे. मात्र येथील रुग्णांना आवश्यक असलेल्या वस्तूंची कमी असल्याने रुग्णसेवेमध्ये बाधा येत आहेत. या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी पुन्हा एकदा हे डॉक्टर उभे राहिले आहेत. या केंद्राला आवश्यक असणारी मल्टीपॅरा मॉनिटर आणि ईसीजी मशीन पनवेल येथील सुप्रसिद्ध हॉस्पिटल प्राचिनचे संचालक डॉ. मंगेश डाके यांनी दिल्या आहेत. तर उरणमधील डॉ. मनीष पाटील यांनी इतर वैद्यकीय साहित्यासाठी एक लाख रुपयांची मदत केली आहे. तसेच डॉ. सुरेश पाटील, डॉ. विकास मोरे आणि डॉ. अजय लहासे यांनी ऑक्सिजन मास्क आणि स्पायरोमिटर भेट केले आहेत. या भेटवस्तूंमुळे रुग्णांना सेवा देण्यास मदत होणार असल्याने, उरणमधील हे खाजगी डॉक्टर उरणकरांसाठी मदतदुत ठरले आहेत.

उरणच्या रुग्णांना आयसीयू बेडची गरज -

उरण तालुक्यामधील कोव्हीड हेल्थ केअर सेंटर मधील 47 बेड हे ऑक्सिजन बेड आहेत. मात्र येथे आयसीयू बेडची व्यवस्था नसल्याने, रुग्णांना उपचारासाठी बाहेर जावे लागते. मात्र ही व्यवस्था येथेच उपलब्ध झाल्यास येथील रुग्ण येथेच बरा होऊन घरी जाऊ शकतो. अशी व्यवस्था उरणमध्ये होणे गरजेचे आहे. मात्र सध्या उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनच्या डॉक्टरांनी पुढाकार घेऊन रुग्ण सेवा करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे येथील रुग्णांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा - कोरोना काळात चिमुकल्याला मिळाल्या दोन आई

ABOUT THE AUTHOR

...view details