महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bas Accident Due To Brake Failure : सहलीची बस 300 फूट दरीत कोसळली, 28 पेणचे विद्यार्थी बचावले

लोहगड पर्यटन करून परत येताना (returning from Lohgad tour) दुधिवरे खिंडीजवळ (brake failure near Dudhivere pass), सहलीसाठी गेलेल्या खासगी क्लासच्या बसचा आज भीषण अपघात (private class trip bus accident) झाला. या बसमध्ये एकुण 31 प्रवासी होते. त्यातील काहींना रुग्णालयात दाखल केले. तर काहीं जण किरकोळ जखमी झाले आहे. Bas Accident Due To Brake Failure

By

Published : Dec 5, 2022, 4:23 PM IST

Bas Accident Due To Brake Failure
सहलीची बस 300 फूट दरीत कोसळली

पेण-रायगड :पेण येथून लोहगड सहलीसाठी गेलेल्या खासगी क्लासच्या बसचा आज भीषण अपघात (private class trip bus accident) झाला. लोहगड पर्यटन करून परत येताना (returning from Lohgad tour) दुधिवरे खिंडीजवळ एका अवघड वळणावर ब्रेक फेल झाल्याने (brake failure near Dudhivere pass) चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटले आणि बस 300 फूट दरीत कोसळली. केवळ दैव बलवत्तर म्हणून बसमधील 28 विद्यार्थी व 3 शिक्षक बालबाल बचावले. यांतील पाच विद्यार्थी जबर जखमी असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तीन बस मध्ये एकूण 88 विद्यार्थी होते. त्यापैकी MH06S9381 ह्या क्रमांकाच्या एका बसला अपघात झाला. Bas Accident Due To Brake Failure


एकूण 95 प्रवासी : पेण शहरातील साठे क्लासेसमधील 88 विद्यार्थी आणि 7 शिक्षक असे एकूण 95 जण मावळ तालुक्यातील लोहगड येथे खासगी बसने सहलीसाठी गेले होते. रविवार सुट्टी असल्याने दिवसभर किल्ले लोहगड परिसरात पर्यटन केले. सायंकाळी पाचनंतर माघारी परत येताना बस क्रमांक MH06S9381 या बसला दुधिवरे खिंडीजवळ भीषण अपघात झाला. एका अवघड वळणावर बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्ता सोडून तब्बल तीनशे फूट खोल दरीत कोसळली. भीषण अपघात होऊनही केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठी जीवितहानी टळली.


6 मुलांना किरकोळ ईजा : या अपघातात बसचा ड्रायव्हर जितेंद्र परशुराम पाटील वय 42 रा.शिर्कि, राजेश मोहन म्हात्रे वय 25 रा.लाखोले, मनस्विनी तेजस मनकवडे वय 11 रा.झीराळआळी, प्रज्ञा धीरज पाटील वय 13 रा.चावडी नाका, इशांन समीर मनकामे वय 12 रा.चावडीनाका, सौ.स्नेहा सुमन गोखले वय 36 रा.चावडी नाका, आदिती विष्णू देवधर वय 14 रा.पेण, शिवम संतोष कदम वय 22 रा.पेण, पूजा गजानन पाटील वय 17 रा. प्रभूआळी सर्व तालुका पेण हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून; याव्यतिरिक्त अन्य 6 मुलांना किरकोळ खरचटलेले असून त्यांना ड्रेसिंग करून घरी सोडून देण्यात आले.


5 प्रवासी रुग्णालयात जखमी :याचवेळी लोहगड घेरेवाडी येथील स्थानिक तरुण, लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत आणि बचावकार्य सुरू केले. पाच जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. पेण मधील विद्यार्थ्यांचा लोहगड येथे अपघात झाल्याचे समजतात पेणचे उद्योजक राजू पिचिका यांनी क्षणाचाही विलंब न लावता अपघात झाल्याच्या ठिकाणावर रुग्णवाहिका पाठवून सर्व जखमी विदयार्थ्यांना अधिक उपचारासाठी पेण व परिसरातील रुग्णालयात दाखल केले.





पालकांची रुग्णालयात धाव : अपघातग्रस्त मुलांनी मोबाईलवरून अपघाताची माहिती शक्य झाले त्या पद्धतीने मित्र आणि कुटुंबीयांना दिली. बसचा अपघात झाल्याची बातमी समाज माध्यमातून पेण शहरात पसरताच पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. मुलांच्या काळजीने घालमेल झालेल्या पालकांनी मिळेल त्या वाहनाने अपघातस्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली. मुलांना पाहिल्यानंतरच त्यांचा जीव भांड्यात पडला.



परवानगी घेतली होती का? : शाळा, कॉलेज असो की खासगी क्लास, विद्यार्थ्यांची सहल काढायची असेल तर, पालकांची संमती आणि शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागते. बऱ्याचदा खासगी बस मालक आरटीओ परमीट काढत नसतात. नादुरुस्त गाड्या विद्यार्थ्यांसह प्रवाशांचा जीव धोक्यात घालतात. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसनेच सहल काढावी असा नियम आहे. असे असतानाही खासगी साठे क्लासचालकांनी कोणाची परवानगी घेऊन सहल काढली? तसेच आरटीओकडून अधिकृत परवानगी होती का? बसची कागदपत्रे आणि चालकाकडे लायसन्स होते का? याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे. Bas Accident Due To Brake Failure

ABOUT THE AUTHOR

...view details