रायगड- मुंबई- पुणे महामार्गावर एका खासगी बस आणि ट्रकमध्ये अपघात झाला्याची घटना घडली. पुण्याहून मुंबईकडे जाणा-या महामार्गावरील बोरघाटातील खोपोली एक्झीट जवळ हा अपघात घडला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून ४ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर खासगी बस आणि ट्रकचा अपघात; दोन जण गंभीर - Private bus and truck accident on Mumbai-Pune Expressway
मुंबई- पुणे महामार्गावर एका खासगी बस आणि ट्रकमध्ये अपघात झाला्याची घटना घडली. पुण्याहून मुंबईकडे जाणा-या महामार्गावरील बोरघाटातील खोपोली एक्झीट जवळ अपघात घडला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून ४ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
![मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर खासगी बस आणि ट्रकचा अपघात; दोन जण गंभीर मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर खासगी बस आणि ट्रकचा अपघात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10031855-63-10031855-1609137026785.jpg)
चालकाचे नियंत्रण सुटून अपघात
हैद्राबाद येथून खाजगी बस (पीवाय 04 / ए 2985) ही ऑरेंज ट्रॅव्हल्स बस मुंबईकडे प्रवाशांना घेऊन निघालो होती. सकाळी पुणे मुंबई महामार्गावर बोरघाटात खोपोली एक्झिट जवळ बस आली असता चालकाचे नियंत्रण सुटले. बसच्या पुढे जाणाऱ्या ट्रकला (एमएच 20/ डीइ 5516) जाऊन बस धडकून अपघात झाला. या अपघातात बस चालकासह सह जण जखमी झाले आहेत. यापैकी दोन जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
मदतीसाठी पोलीस, सामाजिक सेवकांची धाव
आयआरबी यत्रंणा, देवदुत टिम, महामार्ग वाहतुक पोलीस, खोपोली पोलीस, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सस्थेंचे सेवकांनी तात्काळ मदत केली. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.