रायगड -उरण नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाविरोधात उरण महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी सुरू आहे. या पार्श्वभूमिवर महाविकास आघाडीतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उरण नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल व आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी सोबत लढेल, असा विश्वास आघाडीचे प्रवक्ते जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी व्यक्त केला.
भाजपाला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी प्रयत्न -
उरण नगरपालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. नगरपालिकेची मुदत काही महिन्यात संपणार आहे. त्यामुळे भाजपाला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी उरणमध्ये महाविकास आघाडीची मोट बांधण्यात आली आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी रणनीती ठरविण्यासाठी येणार आहे. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नगरपालिकेतील सत्ताधारी भाजपाने मनमानी कारभार करत जतनेला वेठीस धरण्याचे काम केले आहे. शहरात वाहतूक कोंडी, रस्त्यांची अपूर्ण कामे, विजेचा लपंडाव, पाणी टंचाई, टाऊन हॉल, नगरपालिका कार्यालय, बायपास रस्ता, सभागृह आदींचे मोठ्या थाटामाटात भूमिपूजन केले होते; परंतु गेल्या 5 वर्षात यापैकी कोणतीही कामे पूर्ण झाली नाही. उलट विकासकामांच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार मात्र करण्यात भाजपा आघाडीवर असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी केला.
हेही वाचा -भिवंडी बाजारपेठेतील चार दुकाने आगीत जळून खाक