रायगड -अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या ४८ तासात रायगडसह कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगड जिल्हा प्रशासन व आपत्ती प्रशासनाने किनारपट्टीच्या गावांना व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मच्छीमारी नौकानांही समुद्रात जाण्यास बंदी घातली आहे.
रायगड किनारपट्टीवर येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता, जिल्हा प्रशासन सतर्क - कोकण
येत्या ४८ तासात रायगडसह कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्रात ३० ते ४० किमी प्रति तासाने वारे वाहण्यास सुरुवात होणार आहे. तसेच उंच लाटा समुद्रात उसळणार आहेत.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्रात ३० ते ४० किमी प्रति तासाने वारे वाहण्यास सुरुवात होणार आहे. तसेच उंच लाटा समुद्रात उसळणार आहेत. त्यामुळे मच्छीमारी बांधवाना समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. चक्रीवादळ समुद्राच्या आतील भागात होणार असले तरी समुद्र किनाऱ्यावर याचा फटका बसणार आहे.
समुद्र किनारी असणाऱ्या गावांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन व अधिकारी, कर्मचारी यांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. समुद्र किनाऱयावर पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांनाही समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.